*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन तसेच विकासकामांचे भूमिपूजन*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
खामगाव/(संतोष आटोळे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त दि.10 जून 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विधायक कार्यक्रमांसह विकास कामांचे भुमिपुजनाचे आयोजन करण्यात आले आहे.समर्पण,संघर्ष आणि संकल्प हे पक्षाचे ब्रिद असुन लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वांनी संघटीत होवुन पक्ष संघटन मजबुत करणे व जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी 27 व्या वर्धापन दिननिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करणयात आले आहे. सकाळी 10 वाजता गांधी चौक भागातील महात्मा गांधी भवन येथे विविध विधायक कार्यक्रम पार पडणार असून तद्नंतर महात्मा ज्योतीबा फुले सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप व बिस्कीटाच्या पुडयांचे वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामस्थांच्या सुविधांसाठी बुलडाणा जिल्हयाचे लोकप्रिय पालकमंत्री मकरंदआबा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खामगाव विधानसभा मतदार संघात कोटयावधी रुपयांचा विकास निधी दिला असुन त्यापैकी मंजूर करण्यात आलेल्या कंझारा येथे सायंकाळी 5 वाजता 10 लक्ष रुपये किंमतीच्या सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन व जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. तद्नंतर सायं.6.30 वाजता गोंधनापूर येथे 10 लक्ष रुपये किंमतीच्या सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन व जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या विविध विकासकामांचे भुमिपूजन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या विविध विधायक कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी व नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनोज वानखडे अध्यक्ष, खामगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,पुंजाजी टिकार,खामगाव विधानसभा अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, संजय गव्हांदे अध्यक्ष, शेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,श्रीमती सरस्वतीताई खासणे शहरअध्यक्ष,अल्पसंख्यांक सेलचे खामगाव तालुकाध्यक्ष बिलाल खा पठान, खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,सौ.शारदाताई शर्मा,खामगाव महिला शहर अध्यक्षा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विजय काटोले, माजी सभापती शेगाव पंचायत समिती यांनी केले आहे.
0 Comments