Advertisement

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त निघालेल्या* *शोभायात्रेचे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत*खामगाव /(संतोष आटोळे )

*राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त निघालेल्या* 
*शोभायात्रेचे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत*
खामगाव /(संतोष आटोळे )                   राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर महासंघाच्या वतीने बुधवार दि.03 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शरदभाऊ वसतकार यांच्या नेतृत्वाखाली  टीएमसी यार्ड संकुलपासून खामगाव शहरातील प्रमुख मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेमध्ये धनगर समाजाचे नेते,माजी आमदार नानाभाऊ कोकरे,डॉ.पांडुरंग हटकर,श्रीराम पुंडे ,रविंद्र गुरव यांच्यासह आदी मान्यवर सहभागी झाले होते. ही शोभायात्रा अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आली असता या ठिकाणी सोहम गोपाल तारडे यांच्या वतीने शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांना थंड शरबतचे वितरण करण्यात आले. अर्जुन जल मंदिरासमोरुन ही शोभायात्रा नवलचंद मिठुलाल ज्वेलर्स समोर आली असता या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी शोभायात्रेचे स्वागत केले.याप्रसंगी सानंदांनी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शरदभाऊ वसतकार,धनगर समाजाचे नेते माजी आमदार नानाभाऊ कोकरे,श्रीराम कोंडे,रविंद्र गुरव यांच्यासह आदींचा पिवळा दुपटट्ा घालुन सत्कार केला व लाडु भरवुन त्यांचे तोंड गोड केले व उपस्थितांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,शहर कार्याध्यक्ष केशव कापले,विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे सचिव अशोकबाप्पु देशमुख,मुकदद्र खान,सैयद इमरान,गोपाल पाटील,अहेमन खान,संतोष आटोळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

भंडारा उधळत शोभायात्रेचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले. शोभायात्रे दरम्यान येळकोट-येळकोट जय मल्हार, अहिल्या माता की जय अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments