Advertisement

उंबरे दहिगाव शाळेत 7 वी ला निरोप व मुख्याध्यापकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न*

 *उंबरे दहिगाव शाळेत  7 वी ला निरोप व मुख्याध्यापकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न*


::::::::::::::::::::::::::::::::::

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे दहिगाव येथे इयत्ता7वी च्या विद्यार्थ्यांना भावुक वातावरणात निरोप व सेवापूर्ती निमित्ताने मुख्याध्यापक श्री. विष्णू शिंदे यांना शाळा व गावाच्या वतीने शिवरायांची मूर्ती, मानाचा फेटा, शाल व श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करून अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.*

*यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक, प्रसिद्ध कवी व साहित्यिक डॉ. प्रेमनाथ रामदासी सर उपस्थित होते.* *विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मुलांनी स्मार्ट फोन पासून दूर राहावे आणि जीवनात मोठे व्हायचे असेल तर अगोदर लहान होऊन नम्र झाले पाहिजे.आई वडिलांना विसरू  नका पुस्तकांशी मैत्री करा ग्रंथ हेच गुरू होत तेव्हा वाचन कधीच बंद करू नका असा मौलिक सल्ला दिला.* 

*सोबतच माणसाच्या आयुष्यातील कवितेचे महत्त्व आणि कविता रचना कशी करावी हे सांगून वाचनाचे महत्त्व सांगितले व स्वतःच्या कवितांचे सादरीकरण केले आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे कौतुक केले*

*यावेळी 7 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक पंखा भेट दिला. शाळेनीही विद्यार्थ्यांना सुग्रास भोजनाचा आस्वाद दिला. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा अश्रु अनावर झाले बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेचे ऋण व्यक्त केले.* 

*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीता नारनवर या होत्या. कार्यक्रमासाठी उपाध्यक्षा ढोबळे मॅडम, सदस्य शामराव वाघमोडे, ग्रामसेवक एम के शिंदे, किरण गोरे, दत्तू ढेकळे, मधुकर ठोंबरे,सचिन वाघमोडे,ढेकळेवस्ती,पाटीलवस्ती शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक, ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक  केंद्रप्रमुख प्रकाश कांबळे यांनी केले, तर आभार सुनील कसबे यांनी मानले. भैरवनाथ आदलिंगे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जावेद होनवाड, श्रीकांत गुळेग, सत्यव्रत गायकवाड, प्रमोद खरटमल, स्नेहल ताटे, जावेद शेख यांनी परिश्रम घेतले.*





Post a Comment

0 Comments