Advertisement

बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने दिला बँकेचा केबिनमध्ये आत्मदहनाचा इशारा...*

 *बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने दिला बँकेचा केबिनमध्ये आत्मदहनाचा इशारा...*



जळगांव जा.प्रतिनिधी:-


जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले रमेश किसन कोथळकार यांचे जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखे मध्ये सेव्हिंग खाते असून, ते दिनांक 20 एप्रिल रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास सेविंग खात्यामधून पी एम किसान निधी चे पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांनी विड्रॉल भरून दिला असता विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी शेतकरी रमेश कोथळकार यांना म्हणाले की अगोदर तुझ्याकडील थकीत कर्जाची रक्कम भर कर्जाची रक्कम न भरल्यास तूला बँकेतून एक रुपयाही मिळणार नाही, व माझी तक्रार कुठेही केली  तरी मी तुमचे बँकेतील पैसे देणार नाही असे बोलून बँकेचे व्यवस्थापक पाटील यांनी त्यांना अपमानित केले,तसेच यापूर्वीही रमेश कोथळकार यांचे कर्जमाफी यादी मध्ये नाव येऊनही व्यवस्थापक पाटील यांनी शासनाला चुकीची माहिती पुरवून हेतूपुरस्पर त्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले ते एवढ्यावरच थांबले नाही तर रमेश कोथळकार यांच्या पत्नी बचत गटामध्ये सदस्य होत्या व त्या गटाचे खाते विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा जामोद मध्ये होते तर बँकेचे व्यवस्थापक पाटील यांनी बचत गटातील महिलांना रमेश कोथळकार यांच्या पत्नीस काढण्यास सांगितले, यांच्यावर कर्जाची रक्कम असुन ते कर्ज वेळेवर भरत नाहीत तर गटामधील कर्ज काय भरतील असे म्हणून त्यांनी रमेश कोथळकार यांच्या पत्नीस बचत गटामधून काढण्यास लावले, रमेश कोथळकार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना शाखा व्यवस्थापक पाटील यांनी वरिष्ठांना चुकीची माहिती पोहोचवून हेतूपुरस्पर कर्जमाफी पासून वंचित ठेवले व नवीन कर्ज सुद्धा मिळत नाही त्यांनी दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी कर्जमाफी करिता विनंती अर्ज सुद्धा केलेला आहे तरी आजपर्यंत सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी रमेश कोथळकार यांनी जगावे तर कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक चे व्यवस्थापक पाटील यांच्या या मुजोरी पणामुळे अल्पभूधारक शेतकरी असलेले रमेश कोथळकार यांनी जगावे की मरावे हे सुचत नसून त्यातच त्यांच्या मुलांचे शिक्षण घर खर्च शेती यासह दवाखाना इत्यादी सर्व खर्च झेपावा तरी कसा? हा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यांनी या त्रासाला कंटाळून दिनांक 22 एप्रिल रोजी बँक व्यवस्थापकाच्या मुजोरी विरोधात उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशन या सर्वांना तक्रार दिली असून त्या तक्रारी मध्ये न्याय न मिळाल्यास त्यांनी आत्मदहन करेल असा निर्णय घेतला असून अल्पभूधारक शेतकरी रमेश कोथळकार यांना प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा अशी चर्चा  सुरू असून जामोद येथील विदर्भ कोकण बँकेचे मुजोर व्यवस्थापक यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना कोणालाही अशी वागणूक मिळणार नाही अशी तंबी द्यावी. जेणेकरून कोण्याही गरिबाला त्याला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहता येणार नाही..

Post a Comment

0 Comments