Advertisement

जळगाव जामोद वनपरिक्षेत्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात वन परिक्षेत्र अधिकारी बि डि कटारिया 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एलसीबी च्या जाळ्यात

 जळगाव जामोद वनपरिक्षेत्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

 वन परिक्षेत्र अधिकारी बि डि कटारिया 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एलसीबी च्या जाळ्यात



 बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते आता येथे कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी बि डि. कटारिया यांना 25 हजारांची लाच स्वीकारताना बुलढाणा एसीबीच्या पथकाने दिनांक 13 मे च्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले आहे सदर एसीबीच्या कारवाईमुळे संपूर्ण वन विभाग हादरून गेला आहे वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम द्वारकादास कटारिया वय 47 वर्ष यांच्याविरोधात पंचगव्हाण येथील 32 वर्षीय इसमाने लाचेची मागणी केल्याची तक्रार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार यांच्या मालकीचे टाटा 709 हॅलो विवाह दिनांक 10 मे रोजी लाकूड वाहतूक करताना मिळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी देवकर यांनी वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद येथे जमा केले होते तक्रारदाराने वाहन सोडविण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी यांची भेट घेतली असता वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी स्वतःसाठी सात हजार रुपये व इतर कर्मचाऱ्यांसाठी बारा हजार रुपये व दंडाची रक्कम सहा हजाराची एकूण 25 हजाराची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी दरम्यान लाच मागणी बाबत खात्री करण्यात आली सापळा कारवाईदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांना लाचेची रक्कम 19 हजार व दंड सहा हजार एकूण 25 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले सदर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती देविदास घेवारे अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई एस एन चौधरी पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल विलास साखरे पोलीस नाईक मोहम्मद रिजवान रवींद्र दळवी प्रवीण बैरागी पोलीस शिपाई चालक अर्शद शेख यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली सदर आरोपी कटारिया यांना जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे

Post a Comment

0 Comments