Advertisement

एकनिष्ठेने ८३ वर्षाच्या योद्ध्याच्या पाठीशी उभे राहू - कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल संघटन मजबूत करुन सर्व जाति धर्माला सोबत घेऊन काम करू - जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर. प्रतिनिधी : नागेश भटकर

दिनांक ११/१०/२०२३ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगांव जामोद तालुका आढ़ावा बैठक स्थानिक खरेदी विक्री संघ गोडाऊन जळगांव जामोद येथे संपन्न झाली. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर, कार्याध्यक्ष प्रसेनजीतजी पाटिल, नरेशजी शेळके यांचा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा आढ़ावा दौरा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाला आहे. आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी जळगांव जामोद, संग्रामपुर, शेगाव तालुक्याचा पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिने आढ़ावा बैठक घेण्यात आल्या. यावेळी रेखाताई खेडेकर, प्रसेनजीत पाटिल, नरेश शेळके, ज्योतिताई खेडेकर, रफीक सेठ, संगीतराव भोंगळ, संतोष रायपुरे,  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.एकजुटीने ८३ वर्षाच्या योध्यांच्या पाठीशी खंबीरपने उभेे राहण्याचे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष पाटिल यांनी केले तर सर्व जाति धर्माला सोबत घेऊन पक्ष संघटन उभ करण्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष खेडेकर यांनी केले. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला त्या निर्णयाचे जळगांव जामोद येथे स्वागत करुन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. बैठकीला अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष एम.डी.साबीर, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, अल्पसंख्यांक प्रदेष चिटनीस करीम खान, नांदुरा तालुकाध्यक्ष संजय चोपडे, सौ. वर्षाताई वाघ, सौ.सविताताई देशमुख, महादेव भालतडक, एजाज देशमुख, देविदास पारस्कर, विठ्ठल वाघ, सुभाष कोकाटे, प्रकाश कराळे, मोहसिन खान, मंगल डोंगरदीवे, ईरफान खान, दत्ता डीवरे, अताउल्लाह पठान, संतोष पांडे, गुणवंत वाघ, शालिग्राम रोठे, अनंता वाघ,पुरुषोत्तम ताकोते,बळीराम कोकाटे, विठ्ठल घुले, फिरोज खान, दादाराव धंदर, सिध्दार्थ हेलोडे, सुरेश पाचपोर, ताहेर माही, फुरकान खान, जियाउल्लाह, योगेश कुंवर, शेख अब्दुल्ला, बंटी शंकपाल यांच्यासह शेकड़ो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments