दिनांक 11/8/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी जळगांव जामोद यांनी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले.सदरील कार्यक्रम सी.एम.आर.सी कार्यालय जळगांव जामोद येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंडळ कृषी अधिकारी श्री सावंत यांनी केले असुन तालुका कृषी अधिकारी श्री वाकोडे साहेब यांनी प्रास्ताविक केले.सदरील कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक श्री शशांक दाते यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व रानभाज्यांचे उत्पादन या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सागर राऊत यांनी परिश्रम घेतले असुन त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.सदरील कार्यक्रमाला तालुक्यातील महिला व पुरुष उपस्थित होते.कार्यक्रमासाठी कृषी मित्र मोहन राजपुत,विशाल पैसोडे, वासुदेव हिवरकार यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनसाठी जमा केल्या
0 Comments