यवतमाळ नगरपरिषद हद्दीतील जाहिरात फलकांवर( होल्डिंग) तात्काळ कारवाई करा .... महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व जाहिरात फलक हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेत असून नुकत्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार हे सर्व जाहिरात फलक ठळक अक्षरात मराठीत असणे बंधनकारक होते, परंतु दुर्दैवाने यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने याबाबत कुठल्याही ठोस उपाययोजना व पावले न उचलल्यामुळे शहरात कोणत्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली नाही . या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन यासंदर्भात चर्चा केली या इंग्रजी जाहिरात फलकांवर( होल्डिंग वर) तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. वास्तविकतेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होणे अपेक्षित होते,हा एक प्रकारचा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान असून, येत्या सात दिवसाच्या आत या अनधिकृत होल्डिंगवर कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वीपणे नगरपालिका प्रशासन व होल्डिंग मालक जबाबदार राहतील असा इशारा या प्रसंगी मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी याप्रसंगी दिला. या चर्चेदरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाला मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांनी येत्या सात दिवसाच्या आत या सर्व इंग्रजी जाहिरात फलक (होल्डिंग ) वर तात्काळ कार्यवाही करण्याचे चे आदेश देत या संदर्भात स्थानिक प्रशासनाला सूचना देत वृत्तपत्रांमधून जाहीर सूचना ( नोटीस) प्रकाशित करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि शहरात लागलेल्या अनधिकृत होल्डिंगवर तात्काळ कारवाई करून मनसेच्या या रास्त मागणीसाठी मनसेचे त्यांनी अभिनंदन केले. सोबतच त्यांनी येत्या सात दिवसात ज्या जाहिरात फलकांवर मराठी होल्डिंग दिसणार नाही त्यांचे जाहिरात फलक कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे निर्देश त्यांनी दिले .याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, आशिष सरूळकर, सागर नांदेकर, शिवम हुगेवार, उमेश कपिले, किशोर नरांजे, सौरभ पत्रकार यासह इतर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून आम्हास उपकृत करावे.
0 Comments