Advertisement

बाबुराव शेठ लोखंडकार यांना जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर

बाबुराव शेठ लोखंडकार यांना जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर
खामगाव (प्रतिनिधी):-
प्रेस क्लब खामगाव च्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनी दिला जाणारा प्रतिष्ठेचा जिल्हा गौरव पुरस्कार यावर्षी बाबुराव शेठ लोखंडकार यांना जाहीर करण्यात आला आहे उद्या दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी कोलटकर स्मारक मंदिर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे



सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात सतत ६० वर्षे वेगवेगळ्या संस्थाचे निस्वार्थ प्रामाणिक उल्लेखनीय कार्य करून आपला ठसा उमटविणारे बाबुराव शेठ लोखंडकार यांच्या

कार्याचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आझाद शत्रू व मनमिळाऊ स्वभावाचे सुपरिचित व्यक्तिमत्व बाबुराव शेठ लोखंडकार यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments