प्रतिनिधी जळगाव जामोद
दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय निवडनुक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी फूटी संदर्भात पक्ष व चिन्हा बाबत निर्णय दिला. पक्ष व चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय आयोगाने दिला. या निर्णयामुळे जनतेत तीव्र भावना उमटत असल्याचे दिसत आहे.1999 साली ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली त्यांच्या कडून पक्ष हिसकावून घेतल्या जात आहे. या घटनेचा निषेध तथा निवडणुक आयोगाने दिलेल्या असंवैधानिक निर्णयामुळे आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात निदर्शने जळगाव जामोद भीम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करन्यात आली. निवडणुक आयोग तथा सर्व संस्था केंद्र सरकारच्या ईशार्या वर काम करीत आहे. या संस्थाचा उपयोग विरोधी पक्षातील नेते फोडने त्यांच्यावर दबाव निर्माण करने या करीता केल्या जात आहे. आयोगाची स्वायत्ता संपुष्टात आणली गेली आहे त्याचा निषेध आज राष्ट्रवादी शरद पवार समर्थक यांच्या वतीने करण्यात आला. शरद पवार साहेब दिल्ली समोर कधी झुकले नाहित आणि झुकनार सुद्धा नाहीत. त्यांच्यासोबत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भाजपाच्या हुकुमशाही विरोधात त्वेषाने लढेल असे प्रतिपादन प्रसेनजीत पाटिल यांनी केले. निवडणुक आयोग व भाजपा विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष एम.डी.साबीर, युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, कार्याध्यक्ष महादेव भालतड़क,शहराध्यक्ष ईरफान खान, सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे, जिल्हा सरचिटनीस मोहसिन खान,एहजाज देशमुख,युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे,सिद्धार्थ हेलोड़े,अताउल्लाह पठान,राजू पाटिल अवचार, शेख ताहेर,विष्णु रोठे सरपंच,जितु चहेल, मोहम्मद जाकिर, अभिषेक कवळे,भूषण चौधरी, सै. आकिब, गणेश गाड़गे यांच्यासह शेकड़ो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments