Advertisement

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार बच्चू कडू यांचा जाहीर सत्कार*खामगांव /(संतोष आटोळे)

*केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार बच्चू कडू यांचा जाहीर सत्कार*
खामगांव /(संतोष आटोळे)
शिवसेना पक्ष वाढविणे हाच आगामी काळातील मुख्य उद्देश:— आमदार बच्चू कडू 
    शिवसेना नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर खामगाव दौऱ्यादरम्यान शिवसैनिक अँड अमोल अंधारे यांच्या कार्यालयावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार कडू यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यानंतर आमदार कडू यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना पक्ष वाढ हाच आगामी काळातील मुख्य उद्देश असून खामगाव तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
         कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, गावागावात पक्षाची भूमिका पोहोचवावी तसेच लोकांना मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
खामगाव तालुक्यात आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक वेगाने करण्यात येणार असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे,असा संदेशही आमदार कडू यांनी यावेळी दिला.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील डिवरे,गजानन लोखंडकार,शिवसेना, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे, शहर संघटिका कल्पनाताई गायगोळ,युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकार,पिंटू धोंरण,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख  गोपाल भिल,देवेश लोखंडकार, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख विक्की सारवान,रवी माळवंदे,आशिष लांडगे,शुभम मुधोळकर,शिवसेना शहर संघटक तब्बू तायडे,अल्पसंख्याक शहर प्रमुख परवेज पठाण,अभी लोखंडकार,शिवसेना उपशहर प्रमुख जिवन जाधव,भाऊ बिडकर, अशपाक भाई, जबू शेठ, शिवसेना उपशहर प्रमुख करण छापरवाल,आकाश अंधारे,उप तालुकाप्रमुख शिवशंकर सरोदे विभागप्रमुख चेतन शलकर,विभागप्रमुख आकाश माने,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,पंकज अंभारे,ओम अंधारे, ऋषिकेश अंधारे,केशव बोंबटकर, गजानन दाते,मोहम्मद फारुख, रईस भाई,यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments