*सर्व जीवांचे रक्षण या भावनेतून घेतलेला सर्व समावेशक निर्णय महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम*
*देविदास शर्मा यांनी २६ वर्षात १३ हजार जलपात्रा व्दारे भागवीली पक्षांची तहान*
पुर्वी आपल्या घराच्या अंगणात. शेतात. आणी झाडांवर सहज दिसणाऱ्या चिमण्या.पोपट.खबुतर. आणी इतर पक्षी आता हळूहळू कमी होत चालले आहेत झाडांची तोड वाढते प्रदषुण. मोबाईल टावरचे वाढते प्रमाण. पाण्याची टंचाई आणि रासायनिक फवारणी यामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे पक्ष्यांच्या संवर्धन होणे ही काळाची गरज आहे असे आवाहन पर्यावरण प्रेमी तथा धार्मिक. सामाजिक. क्षेत्रात सदा अग्रसर असणारे देविदास शर्मा यांनी केले जर पक्षी कमी झाले तर त्यांचा थेट परीणाम शेतीवर. झाडावर. आणी आपल्या आरोग्यावर होवू शकतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराजवळ किंवा शेतात पक्ष्यांकरीता पाण्याची भांडी व धान्य ठेवावे आणि किमान एक झाड लावावे आपल्या एका छोट्याश्या प्रयत्नामुळे अनेक पक्षांचे प्राण वाचु शकते
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे तापमान देखील उच्चांक गाठू लागले आहे कित्येक ठिकाणी नदी. ओढे कोरडे पडल्याने विहिरी तळ गाठू लागल्याने शेतकच्यांची पिके धोक्यात आलेली आहेत शेतात पाणी नसल्याने असंख्य पक्ष्यांना आपल्या पाण्याची तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आपल्या ला पहावयास मिळते
उन्हाळ्याच्या दिवसात या पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी शहरातील अनेक संघटना व संस्था हे जल पात्र वितरण करीत असतात येथील सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळा तर्फे शहरातील विविध भागात जावून जनुना रोड, शेगाव रोड, घाटपुरी, तलाव रोड या भागात फिरून झाडाला असलेले दुधी भोपळे तोडून आणुन ते वाळवुन स्वच्छ करून त्यांना कमंडलू आकार देऊन एक आगळे वेगळे संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही करत नसेल असे दुधी भोपळ्यापासुन जल पात्र तयार करीत आहे विशेष हे कमंडलू जल पात्र पर्यावरण पूरक व नैसर्गिक असुन पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे या उपक्रमाला आज २६ वर्षे पूर्ण झाले आहे
*( श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सन २००० पासून सुरू करण्यात आला आहे दरवर्षी उन्हाळ्यात नित्य नियमाने राबविण्यात येत आहे. हे जल पात्र बनविण्यासाठी देविदास शर्मा यांचे सहकारी विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे.यांचा सहभाग असतो दरवर्षी साधारण ४०० ते ५०० जल पात्र बनविण्यात येतात हे दुधी भोपळ्यापासुन जल पात्र तयार करण्या करिता २ महीने लागतात आणि त्याचे नागरिकांना विनामूल्य वितरण करण्यात येते दुधी भोपळ्यापासुन जल पात्र बनविण्याचा श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा हा उपक्रम कदाचित महाराष्ट्रातुन एकमेव पहिलाच उपक्रम असावा जल पात्र वितरणा बरोबर भजनी मंडळाचे कार्यकर्ते हे खामगाव परीसरात जावुन हे जल पात्र जे नागरिक या मध्ये दररोज पाणी टाकेल अशा ठिकाणी देतात आणि येवड्या वरच त्यांचे काम थांबत नाही ते या जल पात्र त काही ठिकाणी दररोज आपल्या जवळील वाहनातून पाणी नेऊन या जल पात्र त टाकतात आणी पक्ष्यांसाठी एका पात्रात तांदुळ पण टाकतात या मुळे पशुपक्ष्यांची भुके बरोबर तहान पण भागविण्याचे पुण्य कार्य या भजनी मंडळाचे पदाधिकारी व कार्य कर्ते करीत आहे पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबविण्या साठी लागणारा खर्च भजनी मंडळाचे पदाधिकारी व कार्य कर्ते स्व खर्चातून करतात गेल्या २६ वर्षांत आता पर्यंत अंदाजे १३ हजार जल पात्र वितरण करण्यात आली या वर्षी दुधी भोपळे पासून ३५० कमंडलू जल पात्र तयार करण्यात आले )*
दैनंदिन वाढते प्रदुषणा मुळे चिमणी व पक्षी संकटात आले आहे या लहानश्या जिवाला वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो सध्याच्या परिस्थितीत चिमणी काळाच्या ओघात लुप्त होत आहे त्यांच्या विषयी समाजात जागृती निर्माण व्हावी व त्यांचे योग्य संवर्धन व्हावे या करीता हा उपक्रम राबविण्यात येतो
आता गरज आहे ती प्रत्येकाने पुढाकार घेवून आपल्या घराजवळ एक जलपात्र व मुठभर तांदूळ ठेवण्याची... कारण एका थेंबानेही एखाद्या लहानश्या जीवाला नवे जिवन मिळू शकते
या करीता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, अरूण कडवकर, लालाजी सांगळे. हे अथक परिश्रम घेतात.
0 Comments