Advertisement

भुसावळ रेल्वे स्टेशनवर पार्किंग वसुली अव्वाच्या सव्वा तक्रार दाखल अधिकाऱ्याने दिले कार्यवाहीचे आश्वासन...

प्रतिनिधी 
भुसावळ :- भुसावळ रेल्वे विभागामार्फत मोटार, मोटर सायकल व सायकल पार्किंगची सुविधा करण्यात आलेली असून या कामासाठी ठेकेदारांची नियुक्ती केलेली आहे.मात्र भुसावळ रेल्वे स्टेशनवर अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करून वानधारकांची आर्थिक लूट करून फसवणूक करीत असल्याने रेल्वे प्रशासनाने या प्रकरणांची चौकशी करावी व ठेकेदारास समज व कार्यवाही करावी. अशी मागणी वाहनधारकाने यांनी केली आहे.वाहनधारकांसाठी भुसावळ रेल्वे स्टेशनवर पार्किंगसाठी रेडबोर्ड सुद्धा लावलेला नसून याबाबत रेल्वे स्टेशनकडे विचारणा केली असता ठेकेदाराने मोटर कार साठी ६ तासापर्यंत २० रुपये, ६ ते १२ तासांसाठी ३० रुपये व १२ ते २४ तासासाठी ४० रुपये, मोटरसायकल साठी ६ तासांपर्यंत ५ रुपये, ६ ते १२ तासांसाठी १० रुपये व १२ ते २४ तासापर्यंत १५ रुपये तसेच दुचाकी सायकल साठी ५ ते १० रुपये अशी रक्कम वसूल करावयास पाहिजे असे कळविण्यात आले आहे. मात्र दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी मलकापूर येथील पत्रकार नागेश सुरंगे हे त्यांच्या मित्राकडे पाहुणे येणार असल्याने ते मित्रसमवेत भुसावळ रेल्वे स्टेशनवर आपली कार क्रमांक एम एच २० सी एच ७७२९ घेऊन गेले असता रेल्वे स्टेशनवर मुख्य गेटच्या जवळ असलेल्या पार्किंगच्या कर्मचाऱ्यांनी गाडी पार्किंग आवारात लावण्यास सांगितले. त्यामुळे नागेश सुरंगे यांनी तेथे आपली कार पार्किंग केली व प्लॅटफॉर्म तिकीट काढून पाहुण्यांना घेऊन आले. सदर काम १५ मिनिटात पूर्ण झाल्यानंतर ते परत आले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे ५० रुपयांची मागणी केली. ते पूर्ण केल्यानंतर सुरंगे यांनी पावतीची मागणी केली. यावेळी त्यांनी पावती देण्यास टाळाटाळ करीत एकच साध्या पावतीवर सुरंगे यांची बोळवण केली. पाहुणे सोबत असल्याने ते काल काही बोललेले नाही. मात्र दिनांक २७ ऑगस्ट रोजी त्यांनी भुसावळ रेल्वे कडे ऑनलाइन सर्व पुराव्यासह तक्रार केली असून रेल्वे प्रशासनाने त्याची तक्रार  २०२३०८२७०३३९८ क्रमांकाने नोंदवून लगेच सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवून दिली आहे.भुसावळ रेल्वे स्टेशनसह कित्येक रेल्वे स्थानकावरील पार्किंगच्या ठिकाणी वाहनधारकांची आर्थिक फसवणूक होत असून वाहनधारक वेळेअभावी तक्रारी करीत नसल्याने ठेकेदार व त्यांचे कर्मचारी दाम दुप्पट दराने पार्किंगची वसुली करतात. मात्र पत्रकार नागेश सुरंगे यांनी केलेल्या तक्रारीबाबत रेल्वे प्रशासन ठेकेदारावर कोणती कारवाई करतात की, त्यांना पाठीशी घालतात हे येणारा काळच ठरविणार आहे.

Post a Comment

0 Comments