सातपुडा शिक्षण संस्था संचालित तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व पालक मेळावा याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमातून मुख्य उद्देश विद्यार्थी व पालक यांना कृषी शैक्षणिक विद्याविषयक मार्गदर्शन करणे व स्पर्धा परीक्षे मार्फत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. कृष्णरावजी इंगळे (अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.हरिभाऊजी इंगळे (उपाध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद) डॉ. शेषरावजी भोपळे (सचिव सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद) डॉ. स्वातीताई वाकेकर (कोषाध्यक्षा सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद) मा. श्री. नितीनजी सातव (मुख्य कार्यकारी अधिकारी सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद) डॉ.संदीपजी वाकेकर कार्याध्यक्ष, सातपुडा कॉन्व्हेंट, जळगाव जामोद) व पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्री. गजानन भगत (कृषी सहाय्यक डॉ. पी. डी.के.व्ही.अकोला) प्रा.योगेश गवई (प्राचार्य, स्वा.वि.ग.इं.कृषी महाविद्यालय जळगाव जामोद) प्रा. राहुल तायडे (प्राचार्य,कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव जामोद) डॉ. विशाल तायडे (प्राचार्य,स्वा.वि.ग.इं. उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद) हे उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेऊन महाविद्यालयाचे तसेच संस्थेचे नाव उंचावले. यापैकी श्री. तुषार वाघ यांची निवड (कृषी उपसंचालक, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य) श्री. प्रशिश गव्हांदे (तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य) व श्री. अजिंक्य भटकर (मंडळ कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य) या पदी झालेली आहे. यावेळी सदर यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या मेळाव्याचा उद्देश्य व महाविद्यालयाच्या वाढत्या यशाची गाथा सादर केली. तदनंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून त्यातून महाविद्यालयातून त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलतीवर प्रकाश टाकून या महाविद्यालयामुळे आमची शिक्षणाची सोय झाली असे आवर्जून सांगितले व आपल्या यशाचे श्रेय सातपुडा शिक्षण संस्था,महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांना दिले.
प्रमुख अतिथी मार्गदर्शनातून डॉ. स्वातीताई वाकेकर व डॉ. शेषरावजी भोपळे यांनी कृषी शिक्षणाचा सार सांगून अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था मा. श्री. कृष्णरावजी इंगळे यांनी कृषी विषयाची महती सोबतच गृहकार्य, अभ्यास, सराव, आरोग्य व स्वच्छता, उपस्थिती, मैदानी खेळ, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग आदी विषयावरती उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
यावेळी अंदाजे २५० विद्यार्थी - पालक, तीनही महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. जिव्हेश साळी यांनी केले.
0 Comments