Advertisement

प्रभात क्रमांक दहा मध्ये खड्ड्याचे साम्राज्य नागरिकांना सहन करावा लागतो खड्ड्यांचा त्रास

प्रतिनिधी :-  अकोला
प्रभाग क्रमांक १० श्री राज राजेश्वर मंदिराच्या पाठीमागे नाळे यांच्या घरा पासून शीतला माता मंदिर पर्यंत हा रस्ता कित्येक वर्षापासून विस्कळीत झालेला आहे व खड्ड्यांनी ठिकठिकाणी ढाचलेला आहे व कितेक वर्षा पासून या रस्त्यावरील नाल्या चे नुतनीकरण सुध्दा झालेले नाहीत याव्यतिरिक्त या प्रभागातील काही रस्ते झालेले आहेत हा एवढाच रस्ता कोण्या कारणामुळे झाला नाही याचे ठोस कारण काय आहे. हा रस्ता श्री राज राजेश्वर मंदिराच्या मार्गाकडे जाणारे आहे येथून हजारो भाविक भक्त पायदळ मंदिरावर जात असतात त्यांना या खड्ड्याला सामोरे जावे लागते आता या सणासुनेच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे या रस्त्याचा सध्या वाली कोण इथल्या रहिवाशांना व या रस्त्याला का वगळण्यात आले आहे या प्रभाग क्रमांक १० मधील शितला माता मंदीर गल्लीतील इथल्या रहिवाशांचे व येथून जाण येणं करणारया नागरिकांना या त्रासातून केंव्हा सुटका होणार हे प्रशासनाला मी निवेदन देऊन विचारणा करत आहे.श्रावण महिना लागण्याआधीच या रस्त्याचे काम करणे आवश्यक होते.या रस्त्या व नालया वर लवकरात लवकर उपाय योजना करावी अनथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हा अध्यक्ष सौ प्रशंसा अंबेरे व महिला सेना कडुन मनसे स्टाईल ने त्रिव आंदोलन करण्यात येणार..

Post a Comment

0 Comments