Advertisement

मध्ये प्रदेश परिवहन महामंडळाची बस व दुचाकी यात धडक एक जण जागीच ठार दोन गंभीर जखमी

नांदुरा प्रतिनिधी नागेश भाटकर
आज दिनांक 22 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता दागा पेट्रोल पंपाच्या अलीकडे दुचाकी व बसचा अपघात झाला 
म. प्र. राज्य परिवहन महामंडळाच्या MP-68-P-0246 या नांदुरा कडून खामगाव कडे जात असणाऱ्या बस चा MH-28-BT-7116 या खामगाव कडून नांदुरा जात असणाऱ्या स्कुटीला समोरासमोर धडक होउन अपघात झाला अपघाताची सदर माहिती मलकापूर मतदारसंघाचे आमदार श्री राजेश ऐकडे  माहिती मिळतात ओम साई फाउंडेशन ला फोन करून रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली  ओम साई  फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर आनंद वावगे राजू बगाडे वैभव सनिसे अभिषेक जैन पोलिस कॉ्स्टेबल सुनील सुशिर हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर होऊन अपघातग्रस्तांना प्रथम उपचार करण्याकरिता नांदुरा PHC येथे हलविण्यात आले 
परंतु दुर्दैवाने या घटनेमध्ये नागेश डोंगरे रा.पिंपरी गवळी या युवकाचा मृत्यू झाला त्याच्या सोबत असणारे  राजेंद्र उर्फ प्रवीण इंगळे रा. पिंपरी गवळी व विशाल बर्डे रा. पिंपरी गवळी यांना ओम साई फाउंडेशन च्या रुग्णवाहिकेने  पुढील उपचारासाठी खामगांव येथे हलविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments