Advertisement

जिल्हाधिकारी साहेबांना दिले निवेदन


प्m
प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना 
(अकोला जिल्हाध्यक्ष) सौ.प्रशंसा मनोज अंबेरे  अकोला यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिले निवेदन
अकोला:- हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र महिला सरचिटणीस रिटाताई गुप्ता व जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकर साहेब
राजेशभाऊ काळे जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने निवेदनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील हॉटेल तुषार पासुन ते श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालयापर्यंत नाला व रस्ताचे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. हायवेची व नात्याची बिकट परिस्थिती झालेली आहे. हायवेच्या उजव्या बाजूला रोड व नाल्या मध्ये तीन ते चार फूट रुंद व पाच ते सहा फूट खोल मोठया प्रमाणात गॅप पडलेल्या गॅपमुळे हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. यामध्ये पावसाचे पाणी थांबुन अपघात होऊ शकतात. पहिल्याच पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील हायवेचा रस्ता व नाला सिमेट, रेती निघत आहे. तरी याची चौकशी करण्यात यावी. येणाऱ्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण राहणार. ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता व नाला बनवलेला आहे त्याचे कान उघाडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचा महामार्ग बनवलेला आहे. या रोडवर ये-जा करणा-या प्रवशांचा जिव धोक्यत आहे. हायवे वरील रस्त्याचे चांगले काम लवकरात लवकर करुन रस्ता व्यवस्थीत करण्यात, खड्डे बुजवण्यात यावे, रस्त्याच्या निष्कृष्ट दर्जाची चौकशी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तर्फे तीव्र आंदोलन  करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला. त्यावेळी उपस्थित.सौ.नंदिनी सोपान कांगटे अकोला तालुका अध्यक्ष, सौ.संगिता राजेंद्र मेहसरे सुकोडा सर्कल अध्यक्ष ,सौ.निक्की विशाल अंबेरे मनसे महिला सेना कार्यकर्ता व पदाधिकारी यांची उपस्थिती होत्या..

Post a Comment

0 Comments