मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांनी सन्मान केला आहे.मलकापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. 218 / 2023 भावी कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये कौशल्यपूर्ण तपास करून अज्ञात आरोपीतांची गोपनीय माहिती काढून भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या आधारे चार आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल करून गुन्ह्याशी संबंधित व इतर अशा एकूण 9 मोटरसायकली किंमत 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्याचबरोबर दि.7/ 6 2023 रोजी गु. र. नं. 298/2023 भा.द.वी कलम 363 प्रमाणे दाखल होती सदर गुन्ह्याच्या कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींची गोपनीय माहिती काढून भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी यांना मथुरा उत्तर प्रदेश, कच्छ, भुज ,सुरत, गुजरात. एरंडोल जिल्हा जळगाव, येथून 5 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल करून पंधरा दिवसात पिढीतेचा शोध घेऊन मुलीची विक्री करून देह व्यापार करणाऱ्या टोळीचा परदफाश केला. तसेच दि. 12 / 8 / 2023 रोजी गु. र. नं. 419 / 2023 एन.डी.पी.एस कलम 8 ( क ) 20 ( ब ) 2 ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर प्रकरणी आरोपीतांची अमली पदार्थ संबंधाने गोपनीय माहिती काढून एक आरोपी कडून त्याच्या ताब्यातून 68 किलो 900 ग्रॅम गांजा ( अमली पदार्थ ) किंमत अंदाजे 8 लाख 26 हजार 800 रुपये व एक चार चाकी वाहन एकूण किंमत 13 लाख 26 हजार 800 रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला.
याकरिता मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, डीपी पथक प्रमुख स.पो.नी. करुणाशील तायडे, स.पो.नी. लेडीज सिंघम स्मिता महसाये, पो.नी. सुरेश रोकडे, आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आनंद माने, ईश्वर वाघ, पंजाबराव शेळके, गोपाल तारूडकर,गोपाल इंगळे, मंगेश चारखे, प्रवीण गवई,राहुल वाघ, मुळे, एल, पी, सी, प्रियांका डहाके, निता वाढे, यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, त्याचबरोबर पाचही विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी या सर्वांचे भरभरून कौतुक केले आहे. यामुळे मलकापूर शहर पोलीस स्टेशनचेच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याचे नाव लवकि या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे हे विशेष.
0 Comments