जळगांव जामोद:- जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्याच्या तहसीलदार यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. तालुक्यात 22जुलै 2023 रोजी ढगफुटी मुळे महापूर परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात महापुराचा जलप्रलय झाला त्यामुळे घरांचे, शेतांचेवतसेच इतर नुकसान अतोनात झाले यामध्ये महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्र्तांना सानुग्रह निधी वाटप करण्यात आला. मात्र या सानुग्रह निधी वाटप करतांना तालुक्यातील पंचनामे झालेले सानुग्रह निधीसाठी पात्र असंख्य नागरिक या मदतीपासून वंचित आहेत. त्याचा पाठपुरावा गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना पदाधिकारी करीत असताना तहसीलदार यावर उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ मारण्याचे काम करीत आहेत.तसेच तालुक्यातील जिगाव प्रकल्प मध्ये पुनवर्सन गावठाण नवनिर्मितीच्या कार्य करीत असलेले कंत्राटदार तहसीलदार यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करीत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत. तसेच सदरच्या ठेकेदारांना गौण खनिज वापराचा वाहतूक परवाना खामगाव येथील पिंप्री खडान वरून आहे असे असताना कंत्राटदार तहसीलदार यांच्या वरदहस्तमुळे आजूबाजूच्या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर 100फुटापर्यंत खोल खड्डे करून मशिनिद्वारे उत्खनन करीत आहेत. त्यामुळे भविष्यात याठिकाणी विपरीत घटना घडू शकते.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा उपप्रमुख देविदास घोपे, अजय पारसकर तालुका प्रमुख, अरुण ताडे शहर प्रमुख, संजय धुळे उप तालुका प्रमुख, अमोल दाभाडे युवा सेना तालुका प्रमुख उपस्थित होते.
0 Comments