मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:आज दिनांक 20/09/2023 रोजी दुपारच्या सुमारास मा उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटक्यावर संयुक्त कारवाई केल्याची घटना घडली 1,06,80,000 रकमेच्या मुद्देमाल जप्त करून अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी व धडाकेबाज कारवाई ठरली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वाघुड गावा नजिकच्या खालसा धाब्याजवळ नॅशनल हायवे क्रमांक सहावर एक नागालँड पासिंगचा कंटेनर उभा असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटका व सुगंधित तंबाखू असल्याची माहिती मिळाली.माहिती अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलिसांची टीम सदर ठिकाणी
रवाना होत खालसा धाबा येथे पोहोचली असता तेथे एन एल-०१-एन-५१९६ नंबरचा कंटेनर थांबलेला दिसला त्या कंटेनर चालकाबाबत ढाबा मालक दलबीर सिंह मेहरा यांना विचारणा केली असता थोड्याच वेळापूर्वी तो चालक निघून गेल्याचे ढाबा मालकांनी सागितले दरम्यान कंटेनर मधील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये प्लास्टिक राखाडी व फिकट गुलाबी रंगाच्या गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला सदर कंटेनर शहर पोलीस स्टेशन येथे आणून कारवाई करण्यात आली.सदरची कार्यवाही व तपास मा. सुनिल कडसने सा. पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधिक्षक सा. खामगांव, मा. देवराव गवळी सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सा. पोलीस स्टेशन मलकापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी पोउपनि श्रीकांत विखे तसेच भगवान मुंढे, प्रकाश कोळी,संदिप
0 Comments