Advertisement

मनसे यवतमाळ तर्फे गरबा प्रशिक्षण तसेच आरती संग्रह प्रतिनिधी यवतमाळ

मनसे यवतमाळ तर्फे गरबा प्रशिक्षण तसेच आरती संग्रह
 प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या संकल्पनेतून मनसे गरबा उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनाची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे यांच्याकडून ओपन प्लेस, चंदन नगर, पारिजात सोसायटी, यवतमाळ येथे मोफत गरबा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या गरबा प्रशिक्षणाला परिसरातील भगिनींनी, मुलींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला, सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मनोहरराव पोटे यांच्या मार्फत उपस्थित भगिनींना मोफत आरती संग्रह वाटप करण्यात आले या आरती संग्रहाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहेमान, अँड. अमित बदनोरे शहर अध्यक्ष यवतमाळ , अभिजीत नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, रामरावजी पवार, वसंतराव शेळके परिसरातील माता भगिनी उपस्थित होते. यवतमाळ नवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे, यवतमाळकरासाठी ही विशेष सुविधा मनसे तर्फे आयोजीत केली आहे. व यासाठी यवतमाळ मनसे चे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी विंग चे अध्यक्ष, व सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments