Advertisement

मनसेच्या वतीने हेटस्पीच आणि आयटी अॅक्ट विषयी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे तक्रार दाखल प्रतिनिधी बार्शीटाकळी संदीप गोपनारायण

मनसेच्या वतीने हेटस्पीच आणि आयटी अॅक्ट विषयी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे तक्रार दाखल 
प्रतिनिधी बार्शीटाकळी संदीप गोपनारायण
बार्शीटाकळी पोलिस स्टेशनला निवेदन सादर 

 बार्शीटाकळी विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणाऱ्या सनातन धर्माची डेंगू मलेरिया कोरोना एड्स आणि कुष्ठरोग आधी रोगांशी तुलना करून, सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टालीन, प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्यासोबत पत्रकार निखिल वागडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही हेट स्पीच केल्याविषयी भारतीय दंड संहिता कलम 153 ए .153 बी, 295 ए. 298 505 आणि आयटीआय अंतर्गत गुन्हे तात्काळ दाखल करावेत. आणि त्यांना अटक करावी. हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती संस्कार आणि उज्वला परंपरेचा त्यांनी केलेला अपमान आहे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका बार्शीटाकळी च्या वतीने बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यांनी लेखी तक्रार दाखल करण्याची मागणी केली असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान
झाल्याच्या संदर्भात दाद मागावी लागेल अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असून तालुकाध्यक्ष सचिन पाटील गालट, तालुका उपाध्यक्ष शिवप्रताप मेघाडे, तालुका संघटक
संदीप गोपनारायण , तालुका सचिव विलास गुमसे, उपाध्यक्ष अविनाश पवार, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाळकृष्ण उताणे , तालुका महिला सेनेच्या अध्यक्ष सौ कल्पनाताई राठोड, गजानन काळे, वैभव पाटील कोहर तालुका अध्यक्ष मनवीसे, रोशन जाधव, गणेश खराटे, लखन घुगे, अभी वानखेडे तसेच उमेश कोकाटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments