अकोल्याचे लाडके आमदार व सर्व स्तरावरील बहुगुणी नेतृत्वाचे मानकरी स्वर्गीय श्री. मा. गोवर्धनजी शर्मा उर्फ लालाजी यांना दि.३.११.२०२३ वार शुक्रवार रोजी देवाज्ञा झाली होती. त्यांचे *मासिक श्राद्ध दिनानिमित्त*अकोल्यातील आजच्या जागतीक दिव्यांग दिनाचे दिवशी सिंधी कॅम्प येथील मनपा उच्च प्राथमिक सिंधी हिंदी शाळा क्रमांक १ च्या गोरगरीब व गरजवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना हिवाळ्याचे थंडीपासून संरक्षणा करता भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सौ अर्चना कृष्णा शर्मा,सौआरती अनुप शर्मा ,सौ चंदाताई शर्मा,सौ सुमनताई गावंडे ,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ सीमाताई मांगटे, सौ सारिका जयस्वाल, सौ मंगला सोनोने, सौ भाग्यश्री मापारी ,सौ प्रणिता समृतकर, सौ छाया तोडसम, महानगर सरचिटणीस श्री रमेश अलकरी, श्री अजय पांडे, श्री सुजितसिंग ठाकूर,श्री गजाननराव सोनोने श्री प्रवीण मानकर, प्रमुख उपस्थितीत स्वेटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वेटर वाटप नंतर त्या गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील जो आनंद व उत्साह उसंडून वाहत होता ते बघून स्वर्गीय लालाजींना खरी श्रद्धांजली मिळाली असे प्रतिपादन सौ अर्चना कृष्णा शर्मा यांनी केले. ह्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments