Advertisement

आमदार भारसाकळे शेतकऱ्यांच्या बांधावरपानपिपरी पिकाच्या नुकसानाची केली पाहणी

आमदार भारसाकळे शेतकऱ्यांच्या बांधावर
पानपिपरी पिकाच्या नुकसानाची केली पाहणी
 प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
हिवरखेड :- मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील पानपिपरी या पिकांची प्रचंड नासाडी होऊन नुकसान झाले त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज 4 डिसेंबर रोजी अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. मागील आठवड्यातील 26 नोव्हेंबर पासून जवळपास आठवडाभर अवकाळी पावसाने हिवरखेड परिसरात थैमान घातले या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले मात्र त्यामध्ये पानपिपरी हे पीक तोडणीवर आले होते व काहींनी तोडणी सुद्धा केली होती अश्यात झालेल्या अवकाळी पावसाने या पिकाचे 100 टक्के नुकसान केले.हिवरखेड परिसरातील जवळपास 500 हेक्टर वर पानपिपरी ची लागवड केली असून हे पीक वर्षीक पीक आहे वर्षातून एकदाच घेतल्या जाण्याच्या या पिकाला प्रचंड मेहनत व लाखांच्या घरात पैसा ओतून पानपिपरी चे पीक उभे केले जाते पानपिपरी तोडण्या योग्य झाल्यावर तिची तोडणी करून जवळपास 5 ते 6 दिवसाचा अवधीत या पिकाला सुकविल्या जाते तद्नंतर विक्रीसाठी नेल्या जाते मात्र तोडणी व सुकविण्याच्या कळताच अवकाळी पावसाने धिंगाणा घालून या पिकाचे प्रचंड नुकसान केले याबाबत शेतकऱ्यानि आमदार प्रकाश भारसाकळे यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई साठी शासनाला साकळे घातले शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन आमदार भारसाकळे हे तहसीलदार येवलीकर, तालुका कृषी अधिकारी राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी या संपूर्ण टीम सह शेतकऱ्यांच्या बांधावर हजर होऊन पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली 
त्यांनंतर ऋषी मंहाराज खारसा येथील सस्थानवर शेतकर्‍याच्या छोटेखानी बैठकीत उपस्तीत शेतकऱ्यांनी नुकसानीच्या मदतीसह, पानपिपरी या पिकाला विम्याचे कवच देऊन सदर पीक पीक विम्यात सामील करणे, पानपिपरी पिकाला शासनाकडून अनुदान सुरू करणे, पानपिपरी पिकाची सातबाऱ्यावर नोंद घेऊन पीक कर्ज मिळणे तसेच पानपिपरी पिकाची तोडणी झाल्यानंतर वाळवण साठी वाळवण गृह मिळणे तसेच वेअर हाऊस मध्ये सुद्धा हे पीक ठेवण्याची परवानगी मिळणे अश्या आशयाचे पत्र आमदार भारसाकळे यांना यावेळी शेतकऱ्यांनी दिले

Post a Comment

0 Comments