सात दिवसात दुकानावरील पाट्या मराठीत करा अन्यथा खडकट्याक.मनसेचा इशारा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठी मध्ये असणे आवश्यक असताना देखील मलकापूर शहरातील काही दुकाने व आस्थापनेवरील पाट्या ह्या आद्यपावोत मराठी भाषेत नसल्याचे निर्दशनास आले आहे.हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान असून मराठी भाषेबद्दल आपणास द्वेष असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत प्रशासनस देखील गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे तरी येत्या सात दिवसांत जा. रुम्मस्त,
वर्धा. तालुक्यासह शहरातील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या ह्या मराठीत दिसायलाच हव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने “खळट्याक” करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष कन्हैया गणेश यादव यांच्या नेतृवात वर्धा शहर मुख्याधिकारी नगरपरिषद, जिल्हा वर्धा. यांना निवेदन द्वारे देण्यात आला. २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होत्या. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेण्यात आलेली नाही. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम सहाअन्वये नोंदणी केलेले प्रत्येक दुकान आणि आस्थापनेस कलम सातनुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मद्यविक्रीच्या दुकानांना महनीय व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही देण्यात आले होते.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर रोजी संपलेली असून देखील न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रशासनाने दुकानदारांनवर कोणतीही कारवाही केली नाही मात्र येत्या सात दिवसात इंग्रजी फलक व इतर भाषेतील फलक न हटवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने “खळट्याक” करण्यात येईल, असे निवेदन वर्धा मुख्याधिकारी नगर परिषद, तसेच अध्यक्ष व्यापारी संघटना, अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष कन्हैया गणेश यादव राजकुमार बावरी तालुका उपाध्यक्ष अमजद पठाण दम्मदीप हिवरकर जीवन पोहणकर समीर कसीकर तालुका सचिव अनिकेत ठाकरे उपसरपंच सतीश संसागडे रजनीकांत ठाणेकर विट्टल नादने शंकर वासनिक शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सह मनसे सैनिकांच्या सह्या आहेत.
0 Comments