Advertisement

कोळी महादेव जमात अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र साठी मलकापूर तालुक्यामधील पेटून उठलेल्या कोळी महादेव जमातीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

 कोळी महादेव जमात अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र साठी मलकापूर तालुक्यामधील पेटून उठलेल्या कोळी महादेव जमातीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी नागेश सुरगे 
तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोरील कोळी महादेव जमातीच्या उपोषण मंडप येथे आंदोलन म्हणून दशक्रिया करण्यात आली मलकापूर  बेरार प्रांतातील अमरावती महसुल विभागांमधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळावे तसेच बेरार प्रांतातील पाल पारधी,राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी, टकारी हे विमुक्त जाती अ VJ-A मध्ये येतात तरी पण नाम सदृष्याचा फायदा घेऊन त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळविलेले आहे.ते अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करुन जप्त करण्यात यावे या वरील मागणी करिता कोळी महादेव जमातीचे १) श्री. गणेश पांडुरंग इंगळे, २) गजानन धाडे ,३) संदीप सपकाळ हे तिघे दिनांक ०२/०१/२०२४ पासून अन्नत्याग उपोषण बसलेले आहे, बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असून आज १० वा दिवस असून या उपोषणाकडे आतापर्यंत कोणताच ठोस निर्णय प्रशासन कडून घेण्यात आलेला नसून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आज ११ जानेवारी रोजी हायवे क्र ६ वरील मलकापूर ते मुक्ताईनगर रस्त्यावरील तांदुळवाडी पुला जवळ मलकापूर तालुक्यातील पंचक्रोषीतील कोळी महादेव जमात बांधव,युवा वर्ग,महिला रणरागिणी पेटून उठल्या असून हर हर महादेव,असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,या सरकारच करायचं काय खाली मुंडक वर पाय या घोषणाबाजी देत रस्ता रोको आंदोलन केले नंतर पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी दसरखेड पोलीस प्रशासना पुढे मागण्या मांडून आंदोलन थांबवले या विषयाची सरकारने लवकर भूमिका न घेतल्या पुढील आंदोलन अति तीव्र होण्याची दाट शक्यता या रस्ता रोको आंदोलनाच्या भूमिकेमुळे पहावयास मिळत आहे. तसेच दी. ११/०१/२०२४ रोजी दुपारी १.३० वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मंडप येथे, श्री. गणेश पांडुरंग इंगळे, व श्री. विजय बाम्हंदे यांनी टक्कल करून दशक्रिया आंदोलन केले. या पूर्वी सुद्धा दिनांक ०९/०१/२०२४ रोजी कोळी महादेव जमातीचे टॉवर वर चढून श्री. गंगाधर तायडे व श्री निलेश गवळी यांनी केले होते व बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय ते BSNL office हा परिसर कोळी महादेव जमातीच्या लोकांनी घोषणा देऊन दणाणून सोडला होता. दि.०६/०१/२०२४ रोजी उपोषणकर्ते यांनी अर्धंनग्न आंदोलन केले होते, तरी पण प्रशासन उपोषणकर्ते यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे, येणाऱ्या काळात हे उपोषण व आंदोलन आणखी तीव्र होवू शकते.

Post a Comment

0 Comments