Advertisement

मनसे नेते राजू उंबरकर यांची दस्तुर रतनजी ग्रंथालयास भेट...

मनसे नेते राजू उंबरकर यांची दस्तुर रतनजी ग्रंथालयास भेट
खामगाव प्रतिनिधी 
 मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी आज शहरातील पुरातन असलेल्या दस्तुर रतनजी ग्रंथालयास भेट दिली. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.विठ्ठलजी लोखंडकार यांनी त्यांचे आदरतिथ्य करत स्वागत केले. दस्तूर रतनजी ग्रंथालय सन १८८९ मध्ये या वाचनालयाची स्थापना झाली असून अतिशय सुबक, उत्तम दर्जाची पुस्तके, ग्रंथ आणि वाचन साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे.

प्रसंगी विविध वाचन साहित्य हाताळत वाचनालयाची माहिती घेतली. माणसाला पुस्तके खऱ्या अर्थाने समृद्ध करतात, त्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. प्रसंगी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार व्यक्त केले अस मत राजु उंबरकर यांनी व्यक्त केले

Post a Comment

0 Comments