Advertisement

दाताळा ग्रामसेवक सुधीर ढोले तर देवधाबा ग्रामसेवक दीपक ठाकूर या भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची बदली साठी पंचायत समितीला टाळे ठोकत केले आंदोलन

दाताळा ग्रामसेवक सुधीर ढोले तर देवधाबा ग्रामसेवक दीपक ठाकूर या भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची बदली साठी पंचायत समितीला टाळे ठोकत केले आंदोलन
बदली होत नाही तोपर्यंत टाळे लावून आंदोलन करण्याचा शिवचंद्र तायडे यांनी दिला इशारा

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर 8/1/24 तालुक्यातील दाताळा ग्राम पंचायतचा कारभार ग्रामसेवक सुधीर ढोले ग्रामसेवकाची बदली होऊन पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु तेथील ग्रामसेवक हे पदभार सोडण्यास तयार नाही. तसेच देवधाबा येथील ग्रामसेवक दिपक ठाकूर या ग्रामसेवकांच्या मनमानीला ग्रामस्थ गावकरी मंडळी त्रस्त झाली असून घरकुल व संडास बांधण्याचे पैसे द्याल तर काम होतील अशा भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची बदली होत नाही तोपर्यंत पंचायत समितीला टाळे लावून आंदोलनाचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांनी आज ८ जानेवारी ला पंचायत समिती कार्यर्यालय तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला ताले ठोकले. तसेच या दोन्ही गावांमध्ये
शासनाच्या योजनां चा जसे घरकुल, संडास यासह आदी योजनांचा लाभ देतांना हेतुपुरस्सर पात्र लाभार्थ्यांना डावलण्याचा प्रकार होत असून घरकुलाचे धनादेश तसेच शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण हे दोन्ही ग्रामसेवक करीत रेअसल्याचा आरोप यावेळी तायडे यांनी केला. त्याचप्रमाणे दाताळा येथील ग्रामसेवक सुधीर ढोले यांची बदली होऊन देखील ते आपला पदभार सोडत नाहीत. त्यांना देऊन सांगतात की माझे ग्राम पंचायतीच्या
कामांमध्ये बरेच पैसे अडकलेले आहेत, ते पैसे निघाल्याशिवाय मी कोणालाही चार्ज देणार नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी संघटनेच्या नावावर व आपल्याकडे असलेल्या संघटनेचा पदाचा दुरूपयोग करणे सुरू केले त्याचप्रमाणे दाताळा ग्राम पंचायत बाबत ग्राम विकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आदेश दिल्या नंतरही पं. स. च्या वतीने ग्रामसेवकाला चार्ज दिला गेला नसून खाते बदलही केला नसल्याने ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तेव्हा अशा दोन्ही ग्रामसेवकांना जोपर्यंत तालुक्याच्या बाहेर बदली देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समिती कार्यालयातून जाणार नाही असा इशारा यावेळी शिवचंद्र तायडे यांनी दिला. तर आठ दिवसांमध्ये बदली करतो असे आश्वासन बुलढाणा येथील सिवो यांनी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे .
दाताळा सरपंच सौ. विद्याताई
हरीभाऊ दशमुख यांनी सांगितले की, ग्रामसेवक
ढोले हे आमच्या ग्राम पंचायतीला ग्रामसेवकाची नियुक्ती झाली असतांनाही त्यांना चार्ज देत नाहीत. त्यामुळे ग्राम पंचायतीची अनेक कामे खोळंबली आहे.
तेव्हा यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृउबास संचालक संजय काजळे पाटील, हरीभाऊ देशमुख, देवधाबा सरपंच देवसिंग सोळंके, ग्रा.पं. सदस्य सुवर्णा ढगे, विनोद गोरोडे, विनायक सपकाळ, गोपाल गुरचळ, कुंदन मंडवाले, मोरखेड सरपंच पराग नाफडे, उपसरपंच गिताबाई जंगले, ग्रा. पं. सदस्य दुर्गाबाई तांगडे, योगेश चोपडे, संजय बंड यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments