प्रतिनिधी जळगाव जामोद
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ, मुंबई निवडणूक 2023-24 मतदान 7 जानेवारी 2024 रोजी पार पडली. 17 संचालक मंडळामध्ये 13 लोक अविरोध म्हणून निवडून आले होते. खामगाव झोन मधून गेली 3 टर्म संचालक असलेले प्रसेनजीत पाटिल यांनी माजी आमदार धृपतराव सावळे यांच्यासाठी माघार घेऊन त्यांना झोन मधून अविरोध दिले. संपूर्ण राज्यातून असलेल्या ईतर मागासवर्गीय (ओबीसी ) मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या
विरोधात मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय तथा जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार व अजित पवार गटाचे उदगीर (लातुर ) येथील भरत चामले हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. मंत्री गिरीष महाजन यांनी राज्यभर असलेली संघटनेची, सत्तेची ताकद व मतदान तारखेच्या आधी भरत चामले यांनी बाविस्कार यांना दिलेला पाठींबा यामुळे हि निवडणूक अटीतटीची होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. 7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या निवडणूकीत 11 झोन आणि 23 जिल्ह्यातून 207 मतदारां पैकी 184 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज 9 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रसेनजीत पाटिल यांना 109 मते , चंद्रकांत बाविस्कार यांना 75 मते, भरत चामले यांना 0 मते मिळाली. प्रसेनजीत पाटिल यांनी गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कार यांचा 34 मतांनी पराभव करीत विजय संपदान केला. विजयानंतर त्यांनी जयंतराव पाटिल, अशोकराव चव्हाण, विजयजी वड्डेटीवार,अनिलबाबू देशमुख, ,एकनाथरावजी खडसे,यशोमतीताई ठाकुर,राजेशभैय्या टोपे, प्रतापरावजी जाधव, डॉ. राजेंद्रजी शिंगणे,सुनिलभाऊ केदार, सुरेशराव वरपुडकर, कुणालबाबा पाटिल, सुभाषभाऊ धोटे, अशोकराव पवार, हर्षवर्धन (भैय्यासाहेब) देशमुख, संतोषदादा कोरपे,सुभाषराव ठाकरे, रमेशभाऊ बंग, सुरेशभाऊ देशमुख, संजय देशमुख, धृपतराव सावळे, प्रफुलभाऊ मानकर, प्रविणभाऊ मानकर, अनंतराव देशमुख, शिरीषभाऊ धोत्रे, वसंतराव घुईखेडकर, माणिकराव
0 Comments