Advertisement

विशाल पाटील यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी-- तालुका शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विशाल पाटील यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी-- तालुका शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 
प्रतिनिधी जळगाव (जामोद):दि.८ मूळचा जळगाव जामोद तालुक्यातील विशाल मधुकर झाटे पाटील हा विद्यार्थी अकोला येथे इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. त्याच्या सहकारी मित्रांनी त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केली .सदर मारेकरी अद्याप उघडावर फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशालच्या मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा करावी, अशा आशयाचे निवेदन जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक ८ जानेवारी रोजी देण्यात आले. जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील आणि तालुका प्रमुख गजानन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलेल्या ह्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, आम्ही आपणास जळगांव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देतो की, जळगांव जामोद येथील विशाल मधुकर झाटे हा विदयार्थी अकोला येथे इयत्ता १२ वी मध् ये शिक्षण घेता होता व तो अकोला येथे शिकवणी वर्ग चांगले असल्याकारणाने तेथे शिकत होता. परंतू दिनांक १/१/२०२४ रोजी संध्याकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान जेवण करण्याकरिता रूममधून जात असता एका किराणा दुकानासमोर अकोला येथील गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्यांच्या मित्राचा वाढदिवस असल्याने त्याठिकाण ते वाढदिवस साजरा करीत होते व तुला आज आम्ही गिष्ट देतो म्हणून त्यांनी विशाल मधुकर झाटे या विदयार्थ्यांला आवाज देवून थांबविले व त्याच्या पोटामध्ये सुरा खुपसून त्याची निर्बुनपणे कुर हत्या केली. त्याची त्या मुलांसोबत कुठल्याही प्रकारचे वाद किंवा संबंध नव्हते. तरी सुध्दा त्याची निर्बुन हत्या करण्यात आली व त्यांच्या वडीलांना मधुकर झाटे याला हा एकुलता एक मुलगा होता. शांत व सुस्वभावी तथा अभ्यासू असल्याने त्यांनी त्याला अकोला येथे शिकवणीकरिता पाठविले होतो. आज अकोला शहरामध्ये शिकवणी क्लासेसकरिता बुलढाणा, वाशिम व इतर जिल्हयातून विदयार्थी, विदयार्थीनी येवून शिक्षण घेत आहेत परंतू हया घटनेमुळे अनेक विदयार्थी व विदयार्थीनीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पालकांनी आपल्या मुलांना, मुलींनी घरी परत नेले आहे त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याठिकाणी काही विशीष्ट समाजाचे गुंड प्रवृत्तीचे मुले ही मुलींना मानसीक, शारीरीक त्रास देत असतात याबाबत अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत परंतू वदनामी पोटी अनेक मुली त्रास सहन करत आहेत, म्हणजेच अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे. कायदयाचा धाक शिल्लक राहीलेला नाही.

तरी विशाल मधुकर झाटे यांची हत्या करणा-या व त्यांना सहकार्य करणा-यांविरूष्ट द कडक कार्यवाही करण्यात यावी व मारेक-यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच त्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. श्री उज्वल निकम यांची शासनाने नियुक्ती करावी अशा आशियाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नावे असलेले निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले

सदर निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे ,तालुका शिवसेनाप्रमुख गजानन वाघ, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख मुश्ताक भाईजान विधानसभा,विधानसभा प्रमुख भीमराव पाटील ,शहर प्रमुख रमेश ताडे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील ,युवा सेनेचे विधानसभा अध्यक्ष संकेत रहाटे, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल सातपुते, युवा सेना उपतालुकाप्रमुख गोपाल ढगे, युवा सेना शहर प्रमुख अनिसशेख ,उपशहर प्रमुख रविकांत मेतकर यांच्या सदर निवेदनावर स्वाक्षरी आहेत. 
फोटो: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी..

Post a Comment

0 Comments