Advertisement

आसलगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला लाखोचा सुगंधित गुटखा पकडला

आसलगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला लाखोचा सुगंधित गुटखा पकडला
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद हे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करीचे मध्यवर्ती केंद्र बनले आहे. जळगाव जामोद वरून दररोज कोट्यावधी रुपयाचा अवैध गुटखा निर्यात केला जातो. अशातच पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आसलगाव बाजार येथील बस थांबा परिसरात नागरिकांनी दिनांक 31 जानेवारी रोजी बारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला गुटखा भरलेले आयशर वाहन क्रमांक एम एच 04 केयू 4257 पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सदर वाहनांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या 127 गोण्या मिळून आल्या त्याची किंमत 76 लक्ष 73 हजार पाचशे रुपये असून यामध्ये आरोपी अरमान अली कुतुबुद्दीन अली वय तीस वर्ष राहणार देवरी तहसील लालगंज जिल्हा निर्माणपुर उत्तर प्रदेश येथील असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अन्नसुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किरता वसावे यांच्या तक्रारीवरून आरोपी अरमान अली विरोधात कलम 328,188, 272,273 भादवि सह अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26(2)(i),26(2)(iv),27(3)(d)(e),3(i)(zz),59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आरोपीस न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात एपीआय पांडुरंग इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार करीत आहे.

Post a Comment

0 Comments