सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 25 जानेवारी जागतिक मतदार दिन जागृती ते 31 जानेवारीपर्यंत गावामधून मतदान जनजागृती रॅली निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा तथा वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी गावातून डफडी व हलगीच्या तालावर लेझीम पथकासह प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच यावेळी शाळा समिती अध्यक्ष विनोद आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, महादेव धुर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, संतोष वंडाळे, पत्रकार गजानन सोनटक्के गजानन खिरोडकार, अनिल भगत, ग्रामपंचायत सदस्य द्रोपती गवई, योगिता कुरवाडे, पांडुरंग गवई, विनोद दादा इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शाळा समिती सदस्य यांची उपस्थिती होती. दिनांक 25 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत महावाचक उत्सव चळवळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रेरणादायी प्रसंग कथा अनुभव विविध पैलू व त्यातून आपण घेतलेली शिकवण या विषयावर दिनांक 31 जानेवारी रोजी थीम नाटीकरण वेशभूषा व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप लेखन स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह महानाट्य सादर केले.विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद सर्व शालेय उपक्रमांत दिसून आला.संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी मुख्याध्यापक राखोंडे, वाकेकर,बेग,खिरोडकार सर,क्षीरसागर मॅडम, बोंबटकार,साबे,राजगुरे मॅडम,मनोहर वानखेडे ह्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
0 Comments