जळगाव जामोद शहरासह तालुक्यात वर्षभरापासून खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. जुगार, दारू विमल गुटखा, गोमास, रेती ,मुरूम,विक्री यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे अशा अवैध व्यवसायिंका विरोधात शिवसेना असून हे धंदे बंद करावेत म्हणून निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन जळगाव जामोद पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
तत्कालीन पोलिस निरीक्षक जळगाव जामोद अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळोवेळी लगाम घालून रेती ,मुरूम, जुगार, दारू, गोमास,वाळू तस्करी असे अवैध धंदे बंद करावे. परंतु शहरासह ग्रामीण भागातही एजंटाची संख्या वाढत आहे. अनेक गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्ती असल्याने पैसा मिळवण्याच्या हेतूने ते चो-यासारखे गुन्हेही करत आहे. वाळू आणि चोरीचे प्रमाण वाढले आहे.यामध्ये एसटी बस स्थानक देखील सुटले नाही. ग्रामीण भागातून परगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना देखील या चोरट्यापासून सावध राहण्याची वेळ आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी देखील भयभीत झाली आहे. ग्रामीण भागात एजंट आजही खुले आम गावठी दारू, जुगार, धंदा करीत असून , जुगार, दारु विक्री, राजेरोसपणे सुरु आहे. पोलिसांनी धडक कार्यवाही करुन अवैध धंदे सुरु असणा-याच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.त्यामुळे , जुगार, दारू विक्री, वाळू तस्करी असे अवैध धंदे आपण तात्काळ बंद करावेत, अन्यथा शिवसेना पक्षाच्यावतीने जनआंदोलन करण्याचा इशारा निवेदनात नमुद केले. सदर निवेदनाच्या प्रती
मा.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा
यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावरती भीमराव पाटील, शुभम पाटील, विशाल ताकोते, पाटील आदींच्या सह्या आहेत.**अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा याकरीता आज 20 जून रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद ला निवेदन देण्यात आले.सदर निवेदनामध्ये नमूद आहे की जळगाव जामोद सह तालुक्यात अवैध धंद्याचा ऊत आला आहे.या मध्ये देशी दारू, गावठी दारू, जुगार, वरली मटका सारखे धंदे हे खूप जोरात चालू आहेत . या सगळ्यांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम घडत आहे...या सारख्या प्रकारामुळे गावा गावात सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत असुन योग्य ती कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनासंदर्भात पोलीस खात्याने सकारात्मकता दाखवून अशा धंद्यावर कारवाई करावी . आणि सामान्य जनतेला शासनाची जाण करून द्यावी.... ही मागणी येत्या 25 जून पर्यंत मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल .असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे ,विधानसभा संघटक भीमराव पाटील , मा.युवा सेना तालुकाप्रमुख विशाल ताकोते पाटील, उप शहर प्रमुख सुभाष माने विभाग प्रमुख गजानन मांडेकर राजू भाई तडवी सह असंख्य शिवसेना युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments