सिंदखेडराजा (ता. २४ जून २०२५):
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयात लाचखोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. दोन महसूल कर्मचाऱ्यांना तब्बल ७,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे त्यात आरोपीं रावसाहेब बाबुराव काकडे – तलाठी, वय ५० वर्षे, ता. सिंदखेडराजा, व मनोज काशीराम झीणे – महसूल सहायक, वय ४५ वर्षे, कार्यरत: तहसील कार्यालय सिंदखेडराजा.
सविस्तर सविस्तर वृत्त,तक्रारदार व्यक्तीस शिवारातील शासकीय शेतजमिनीचा नामांतरी व्यवहार लवकर करण्यासाठी आरोपी तलाठ्याने ७,००० रुपये लाचेची मागणी २० जून २०२५ रोजी केली होती. त्या बाबत तक्रारदाराने ही माहिती एसीबीकडे दिल्यानंतर २४ जून रोजी पोलिस निरीक्षक श्री. भागोजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. आरोपींना रु. ७,००० लाच स्वीकारताना तहसील कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले.
सदरकार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती २.मा.श्री. सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. भागोजी चोरमले, पोलीस उपअधिक्षक, पोलीसं निरीक्षक, श्री. रमेश पवार, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा, व सोबत सापळा पथक एएसआय, शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण बैरागी, राजेंद्र क्षिरसागर, पोना / जगदिश पवार, विनोद लोखंडे, पोकॉ. शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, चापोना नितीन शेटे, चापोकों/शेख अरशद, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी पार पाडली.एसीबी व इतर सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्परतेने ही कारवाई यशस्वी ठरली
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
लाचखोरीला चाप बसावा आणि शासकीय व्यवहार पारदर्शक व्हावेत, यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
0 Comments