सोनाळा: संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले सोनाळा गावात संत नगरीत सोनाजी नगर सर्वात मोठा वॉर्ड आहे. सर्व मजूर वर्ग असून मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह येथील नागरिक करत असतात. ग्रामपंचायत ने काही दिवसांपूर्वी सोनाजी नगर येथील ऊरुवेला बुद्ध विहार गल्ली मध्ये भोंगरे यांच्या घरापासून विहारा पर्यंत जुनी नाली खोदून काढली. जो पर्यंत खोदली तिथ पर्यंत पूर्ण काम न करता अर्धवट काम करून ऊरुवेला बुद्ध विहारा पर्यंत पोहचले नाहीत.
सर्व खोदून पडलेली नाली चे सांडपाणी जागावरच मुरत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालीचे काम अर्धवट न करता काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गावकरी सोनाजी नगर वासियांकडून होत आहे. तरी सोनाजी नगराकडे सोनाळा ग्रामपंचायत ने दुर्लक्ष न करता थोड तरी लक्ष देऊन काम करीत असलेल्या कंत्राटदारांना नालीचे काम पूर्ण करण्याची सूचना ग्रामपंचायत ने दिली पाहिजे. जेणेकरून उर्वरित नाली चे काम बुद्ध विहारापर्यंत पूर्ण होईल. गावातील कोणत्याही गल्लीमधील नाल्याचे कामे रखडली असतील ती सर्वच पूर्ण करावी. पावसाळ्यामध्ये अशा अपुऱ्या कामामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तरी ग्रामपंचायत ने आरोग्य धोक्यात येईल अशा बाबीकडे दुर्लक्ष न करता सर्वच कामे पूर्ण करावी. अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे.
0 Comments