*सुदर्शन वस्तीत हिंदुत्वाचा जागर; शोभायात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमाने हिंदु संमेलनाला रंगत*
बाळापूर फैल सुदर्शन वस्तीमध्ये ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र. ७ येथे हिंदू संमेलन उत्साहात पार पडले.
संमेलनानिमित्त परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक बँड, टाळ-मृदुंग आणि वारकरी यांच्या सहभागामुळे शोभायात्रेला विशेष आकर्षण लाभले. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व गौ -पूजनाने करण्यात आली. त्यानंतर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,रमाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कु.कोमल ताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
मंचावर संदिपान आश्रम निमगांव चे वासुदेवानंद सरस्वती महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत सहकार्यवाह अजयजी नवघरे, महिला वक्त्या कु.समीक्षा ताई गोरे तसेच सुदर्शन वस्ती हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष कृष्णा खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून सामाजिक एकता व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. विनिता ताई घोगल यांनी केले. प्रास्ताविक अमोल बुट्टे यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य गायकवाड यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments