Advertisement

कर माफी सह ५% निधी मध्ये वाढ करा दिव्यांगांची मागणीखामगाव/(संतोष आटोळे)

कर माफी सह ५% निधी मध्ये वाढ करा दिव्यांगांची मागणी
खामगाव/(संतोष आटोळे)
       खामगाव शहरातील दिव्यांग व त्यांच्या पालकांच्या वतीने आज दिनांक ०९/०२/२०२५ रोजी नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर व मुख्याधिकारी नगरपरिषद खामगाव  यांना निवेदन सादर करण्यात आले की, खामगांव शहरातील सर्व दिव्यांग बांधव यांना शतप्रतिशत कर माफी मिळणेबाबत तसेच कर वसुली मधील ५% निधी मध्ये वाढ करणे बाबत या मागणीचे निवेदन देण्यात आले 
       आपल्या  शहरातील सर्व दिव्यांग यांनी मिळून  निवेदन सादर केले की दिव्यांग हे आपल्या शहरातील कायम रहिवाशी असून  नगरपरिषद कार्यक्षेत्रातील विविध प्रकारचे कर नियमित स्वरूपात भरत असतात.
सध्या संपूर्ण शहरांमध्ये करवाढ मुळे खामगाव शहरातील संपूर्ण जनता वाढीव कर आकारणी वर हरकती पेण्याकरिता आपल्या कार्यालयाकडे रीतसर अर्ज सादर करीत आहे. 
त्याच अनुषंगाने दिव्यांग व  पालक यानी लेखी निवेदनद्वारे कळविले की "आम्हा दिव्यांग व  दिव्यांग पालकांना कर आकारणी मध्ये आपल्या नगरपरिषद कार्यालयाच्या माध्यमातून शतप्रतिशत कर माफी देण्यात यावी "व या कर माफीच्या माध्यमातून दिलासा देण्याचे करावे.

       महाराष्ट्र राज्यामध्ये काही महापालिका व नगरपालिकेमध्ये करमाफी देण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने खामगाव नगर परिषदेने दिव्यागांचा विकासात्मक दृष्टिकोन लक्षात ठेवून त्यांना शत प्रतिशत कर माफी देत दिलासा देण्याकरिता तसेच आपल्या नगर परिषद मध्ये ५% निधी मध्ये मालमत्ता कराच्या उत्पन्नातून स्वनिधी वाढीव वितरित करणे गरजेचे असताना आपण त्यात अल्प प्रमाणात वाढ केली आहे, वास्तविक उत्पन्नात भरघोस वाढ झाली असताना शासन परिपत्रकानुसार त्यातही स्वनिधी मध्ये ५% वाटप दिव्यांग घटकाला करावे या रास्त मागणीला आपण दखल घेत न्याय देण्याचे कराल  असे ही  निवेदन मध्ये म्हटले आहे 
यावेळी मनोज नगरनाईक, शत्रुघन इंगळे, विनोद खोडे, महेंद्र  छगानी, मोहम्मद शकील, गजानन कांबळे,शेखर तायडे, मधुकर पाटील तसेच दिव्यांग फाउंडेशन जिल्हाध्यक्ष कविताताई इंगळे, पल्लवी ताई पाटील,सुरेंद्र चव्हाण,अब्दुल राजिक आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments