Advertisement

ऑल इंडिया क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कु.प्रणालीची निवड* खामगांव/(संतोष आटोळे)

*ऑल इंडिया क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कु.प्रणालीची  निवड* 
खामगांव/(संतोष आटोळे)
          स्थानिक श्रीमती सु.रा मोहता महिला महाविद्यालयाची  वेगवान धावपटू कु. प्रणाली संजय शेगोकार ,हिची दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा मंगलोर युनिव्हर्सिटी मंगला गंगोत्री कर्नाटका येथे होणाऱ्या क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून अव्वल स्थानी निवड होऊन ती संत गाडगे अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील वर्षी सुद्धा प्रणालीला ऍथलेटिक्स व क्रॉस कंट्री मध्ये विद्यापीठात प्रथम येवून  कलर कोटची मानकरी ठरली होती .यावर्षी सुद्धा तिने आपलं स्थान कायम ठेवत दुहेरी कलर मिळवलेला आहे .अशी विदर्भातील वेगवान धावपटू प्रणाली आंतरविद्यापीठात सुद्धा अग्रस्थानी राहील, अशी आशा आहे.तीने खेळ व शारीरिक शिक्षण विभागाचा यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढून महाविद्यालयीन नावलौकिकात निश्चितच भर टाकली  आहे.    


           तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.काकासेठ संघवी, श्री.मनोजभाई नागडा, श्री.हिरेनभाई लोडाया, श्री.विजुभाई नागडा व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य सौ.हेमा जंवजाळ,खेळ व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सौ.सीमा देशमुख, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी प्रणालीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments