*खामगांव येथील रहिवासी सुरेश पाटील यांनी "गण गण गणात बोते" 1कोटी 25 लक्ष मंत्र लिहून प्रमुख नद्या मध्ये केले विसर्जित*
खामगांव येथिल श्री संत गजानन महाराजांचे निस्सिम भक्त सुरेश पाटिल हे 2014 मधे शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले . त्यानी आपले दैनंदिन कामे सांभाळून श्री गजानन महाराजांचा" गण गण गणात बोते "हा मंत्र 1 कोटि 25 लक्ष लिहून पवित्र गंगा,यमुना,नर्मदा, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी, कृष्णा,भीमा अमरजा, गोमती, तापी,पूर्णा या पवित्र नद्यांच्या संगमावर श्रद्धापूर्वक विसर्जित केल्या.विशेष म्हणजे त्यांनी ओमकारेश्वर येथील नर्मदा नदीमध्ये जास्तीत जास्त लिहिलेल्या गण गण गणात बोते या मंत्राचे विसर्जन केले .
नर्मदा ही भगवान श्री शिवजींची कन्या आहे व श्री गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना नाव डुबत असताना नर्मदेने संकटातून मुक्त केले त्यांच्या आई-वडिलांच्या अस्थीचे विसर्जन सुद्धा याच नर्मदा मध्ये केले होते ." गण गण गणात बोते" या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की यांच्या शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण झाल्या त्यातही भरपूर व्याधी दूर झाल्या ते दवाखान्यामध्ये जात नाही ते म्हणतात माझा डॉक्टर गजानन आहे. ते म्हणतात श्रींच्या आरतीमध्ये म्हटले आहे व्याधी वारुन केले कैका संपन्न करविले भक्तांना लागी विठ्ठल दर्शन ते श्री च्या नावावर आहे आणि गजानन महाराज त्यांचा कामावर आहे .
0 Comments