*कायद्याच्या चौकटीत राहुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियमाकुल करण्यासाठी संघटीत होवुन लढा द्या*
....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
खामगाव/(संतोष आटोळे)                 येथील रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून  साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा प्रशासनाने लवकरात लवकर नियमाकुल व कायमस्वरूपी करुन याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक स्मारक तयार करून त्याची सौंदर्यीकरण करण्यात यावे.या मागणीसाठी सोमवार दि.23 मार्च 2026 खामगावात शेकडो मातंग समाज बांधवांनी एकत्र येवून सामाजिक एकतेचे दर्शन घडवित मा.उपविभागीय अधिकारी खामगाव यांना मागणीसंदर्भात निवेदन सादर केले व पुतळा संदर्भात महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्यासोबत चर्चा देखील केली.
दि.23 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास खामगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह रेल्वे स्टेशन चौक परिसरात  ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसविण्यात आला आहे त्या ठिकाणी भेट देवुन मातंग समाज बांधवांच्या तीव्र भावना जाणुन घेतल्या.यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,शहर कार्याध्यक्ष केशव कापले,तुषार चंदेल,रोहित राजपुत,जयराम मुंडाले, मुन्ना बोंद्रे,श्याम मोरे आदींची उपस्थिती होती. मालधक्का चौक परिसरात अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा बसविण्यात आला आहे
 प्रशासनाने हा पुतळा नियमाकुल व कायमस्वरुपी करुन पुतळयाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे ही मातंग समाज बांधवांची प्रमुख मागणी आहे असे मातंग समाज बांधवांनी सांगितले असता या मागणीला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहिर पाठींबा दिला.  
याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कृष्णा नाटेकर,महादेव अडायके यांच्यासह मातंग समाजातील वरीष्ठांसोबत चर्चा केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा,कांदबरीतुन समाजाला दिशा देण्याचे काम केले. अण्णाभाऊ साठे यांचा खामगाव शहरामध्ये जो पुतळा बसविण्यात आला आहे त्याला प्रशासनाने नियमाकुल करावे ही    ही मातंग समाज बांधवांची अतिशय रास्त मागणी आहे. परंतू ही मागणी पुर्ण होत असतांना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी व कायद्याच्या चौकटीत राहुन पुतळा स्थापनेला  परवानगी मिळावी यासाठी संयम ठेवुन शांततेच्या मार्गाने आपली मागणी रेटुन धरावी.आपल्या रास्त मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहिर पाठींबा आहे असे सानंदा यांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडुन नियमानुसार पुतळा बसविण्याची परवानगी मिळाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी आणुन पुतळयाचे सौंदर्यीकरण केले जाईल अशी ग्वाही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली. नगर पालीकेच्या जागेमध्ये अज्ञातांकडुन लोकशाहिर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसविण्यात आला, याप्रकरणी खामगाव नगर पालीकेकडुन संबंधीतांनी तक्रार दिल्यानंतर राजकीय दबावापोटी ज्या निर्दोष व्यक्तींवर जे गुन्हे दाखल करण्यात आले  ते सर्व खोटे गुन्हे खारीज करण्यासाठी सुध्दा आपण शासन दरबारी प्रयत्न करु अशी ग्वाही सानंदांनी दिली.यावेळी लोकशाहिर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो,जय लहुजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.यावेळी सुरेश बोरकर,रुपेश अवचार,नामदेव बाभुळकर,चेतन इंगळे,पवन खंडारे,लखन खंडारे,अजय नाटेकर यांच्यासह मातंग समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.