Advertisement

सर्व मिडिया हाऊस व प्रिंट मिडिया प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य.विषय : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बातम्या प्रसारित करताना वस्तुस्थितीची अचूक मांडणी करण्याबाबत.. सौ गीता सोनोने

प्रति,
सर्व मिडिया हाऊस व प्रिंट मिडिया प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य.

विषय : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बातम्या प्रसारित करताना वस्तुस्थितीची अचूक मांडणी करण्याबाबत.

महोदय,

सदर पत्राद्वारे आपणास सकल धनगर समाज महाराष्ट्राच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे की, धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध माध्यमांमध्ये वारंवार चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण होत असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धनगर समाजाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की, समाज नवीन आरक्षणाची मागणी करीत नाही तसेच कोणत्याही नवीन प्रवर्गात समावेश करण्याची मागणी सुद्धा करीत नाही. भारतीय घटनेतील अनुसूचित जमाती (ST) यादीतील क्रमांक ४७ अंतर्गत, क्रमांक ३६ वर “धनगड” (हिंदी) अशी नोंद करण्यात आलेली आहे, तर त्याच संदर्भात मराठी भाषेत “धनगर” अशी नोंद आहे. त्यामुळे धनगर समाजाची मुख्य व एकमेव मागणी म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या या नोंदीनुसार आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, ही आहे.

म्हणून आपणास विनंती करण्यात येते की, यापुढे धनगर समाजाबाबत कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी वरील वस्तुस्थितीचा विचार करूनच बातम्या द्याव्यात. चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे टाळावे.

तसेच, हे पत्र दिल्यानंतरही जर माध्यमांद्वारे चुकीची माहिती प्रसारित केली गेली, तर महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्या वतीने संबंधित मिडिया कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

आपण वस्तुनिष्ठ व जबाबदारीने बातम्या प्रसारित करून समाजात योग्य संदेश पोहोचवावा, ही अपेक्षा.

धन्यवाद.

आपला विश्वासू,
सकल धनगर समाज महाराष्ट्र

(सर्व उपोषणकर्ते व आंदोलनकर्ते यांच्या सह्या संलग्न)
वरील पत्राद्वारे सर्व मिडिया हाऊस आणि प्रिंट मिडिया यांना कळवले तर पुढील न्यूज देताना निश्चितच सुधारणा होईल असे वाटते.

Post a Comment

0 Comments