३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमीत्त अकोल्यात शोभायात्रा हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !स्वागताध्यक्ष विशाल दिवनाले यांचे आवाहन
अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती, अकोला यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी दि.३१ मे २०२६ ला अकोला शहरात शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे. प्रमिलाताई ओक हॉल, अकोला येथे सायंकाळी ५.०० वा. शोभायात्रेचे उद्घाटन होईल.
अध्यक्षस्थानी धनगर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने हे राहणार आहेत. शोभायात्रेचे उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक केशवराव पातोंड हे राहतील. याप्रसंगी अहिल्यादेवींच्या जीवन चरित्र्यावर व्याख्यान देण्याकरीता कोल्हापूर येथून विठ्ठल विरोबा संस्थानचे मुख्य पुजारी नारायण खानुमोठे (मोठे देसाई) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील.
शोभायात्रेला प्रमुख अतिथी म्हणून मा.महापौर सौ. सुमनताई गावंडे,बळीरामजी चिकटे,गोपालभाऊ कोल्हे, विठ्ठलराव पातोंड, कृ. उ.बा. समिती तेल्हाराचे सभापती शामभाऊ घोंगे, अकोलाचे उपजिल्हाधिकारी निखीलजी खेमणार,सौ योगितातातई रोकडे, सौ पुष्पाताई गुलवाडे,काशिरामजी साबळे, साहेबराव पातोंड, रामदासजी होपळ गुरूजी, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अकोला जिल्हाध्यक्ष एम. के. दिवनाले,दिपकराव पातोंड,सुधाकरराव गाडगे,शंकरराव खराटे आदिंची उपस्थिती राहिल.
प्रमिलाताई ओक हॉल येथून शोभायात्रेस सुरूवात होईल.
शोभायात्रेस धनगर समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे नम्र आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गोपाल गावंडे, कार्याध्यक्ष मनोज करणकार स्वागताध्यक्ष विशाल दिवनाले,विकी लाखे यांच्यासह सर्व पदाधिकारी आदिनीं आव्हान केले आहे.
0 Comments