मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलीसांची दमदार कामगिरी. कत्तली साठी डांबलेल्या 17 गोवंशाची सुटका 3.45 लाख रुपयांची गोवंश जप्त आरोपी वर गुन्हा दाखल..सौ गीता सोनोने
जळगाव जामोद मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांनी कुरेशी मोहल्ला येथे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 17 जिवंत गोवंश जनावराची सुटका केली आहे .जप्त केलेल्या गोवंशाची एकूण किंमत 3 लाख 45 हजार रुपये आहे .दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कुरेशी मोहल्ला येथे काही इसमानी जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याविना बांधून ठेवले आहे. तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली असता 17 जनावरे निर्दयतेने बांधलेली आढळली. चौकशीत सदर जनावरे शेख शेरा शेख युसुफ राहणार कुरेशी मोहल्ला यांच्या मालकीची असल्याचे समोर आले .
जप्त केलेला गोवंश.
तांबड्या रंगाचे 9 गोरे अंदाजे किंमत 90 हजार रुपये
पांढऱ्या रंगाचे 1गिर बैल अंदाजे किंमत 10000 हजार रुपये.
तांबड्या रंगाचे 2बैल अंदाजे किंमत 700000.
पांढऱ्या रंगाचे 5 बैल 1 लाख 75 हजार रुपये .असा एकूण 3 लाख 45 हजार रुपयाचा जिवंत गोवंश जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी शेख शेरा शेख यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अप क्रमांक 328/ 2026 कलम. .5 (क) 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 11 (1) (ज) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे (भा.पो.से)यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे. पोलीस उपनिरीक्षक खाडे. पोलीस हवालदार वाळूकर. पोलीस हवालदार इरफान. पोलीस हवालदार निलेश पुंडे. पोलीस हवालदार मोहाळे .पोलीस हवालदार मोरे .पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत. पोलीस कॉन्स्टेबल ढोण. पोलीस कॉन्स्टेबल डब्बे. पोलीस कॉन्स्टेबल सोळंके. पोलीस कॉन्स्टेबल झाल्टे. पोलीस कॉन्स्टेबल पाटोळे. पोलीस कॉन्स्टेबल टोगळे. यांनी ही कारवाई केली
0 Comments