Advertisement

खामगावात शिवसेना BLA-२ बूथप्रमुख प्रशिक्षण शिबीर संपन्न; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन**खामगांव /(संतोष आटोळे )

*खामगावात शिवसेना BLA-२ बूथप्रमुख प्रशिक्षण शिबीर संपन्न; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन**
खामगांव /(संतोष आटोळे )
 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि बूथ स्तरावर प्रभावी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१७ मे) खामगाव शहरातील देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबीर पार पडले. खामगाव व शेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि BLA-२ बूथप्रमुखांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.'SIR' अभियानाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभरात शिवसेनेचे 'BLA नेमणूक अभियान' वेगाने सुरू आहे. याच अभियानाचा भाग म्हणून या बैठकीत खामगाव मतदार संघातील बूथ निहाय BLA नेमणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बूथवर BLA नेमणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पुढील कार्याची दिशा यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली.


या प्रशिक्षण शिबिरास शिवसेना पश्चिम विदर्भ सचिव  वैभव थोरात, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख  संजय सोनार आणि शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक संजय अगलदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन आणि स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी, याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले.या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख  शांताराम दाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख  संतोषराव डिवरे, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शारदाताई पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख  संजय अवताडे, खामगाव शिवसेनेचे नेते अमोल अंधारे, शिवसेना तालुका प्रमुख  राजेंद्र बघे आणि रामा थारकर यांच्यासह खामगाव  विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे नेते: प्रतापराव जाधव
मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले> "शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. यामुळेच आज जनतेकडून पक्षाला मोठा पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी अविरत कार्य करणे हीच खरी शिवसैनिकाची ओळख आहे.

Post a Comment

0 Comments