मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बंडूभाऊ चौधरी व राजू पाटील यांच्या पुढाकारातून आमदार राजेश एकडे यांचा गुलाब पुष्प गुंफलेल्या एका भव्य हाराने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सत्कार करण्यात आला.
दिवसभरात विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा.
प्रारंभी माजी आमदार वसंतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर येथील बस स्टॅन्डचा नूतनीकरण कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ, काँग्रेस नेते डॉ. अरविंद कोलते यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर येथील जनसंपर्क कार्यालयासमोर लाडू तुला, माजी नगरसेवक सुहास चवरे यांच्या निवासस्थानी स्नेहीजनांच्या वतीने कौटुंबिक सत्कार सोहळा, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांच्या अध्यक्षतेखाली वल्ली चौक ते पारपेठ शाळा क्रमांक २ येथे भव्य नागरी सत्कार समारंभ, महिला काँग्रेसच्या वतीने भातृ मंडळ येथे केक कापायचा कार्यक्रम, काँग्रेस नेते अॅड साहेबराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चाळीस बिघा भातृ मंडळ येथे लाडू तुला व भव्य अभिष्टचिंतन सत्कार सोहळा, काँग्रेसचे नेते दिलीपभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली माता महाकाली नगर स्थित स्व. लक्ष्मण हिरू चव्हाण वैकुंठ धाम येथे केलेल्या सुशोभीकरण कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व महादेवाच्या मूर्तीचा भव्य प्राणपतिष्ठा कार्यक्रम, सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर चाळीस बिघा स्थित भातृ मंडळात भोजनाची व्यवस्था आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान काँग्रेस नेते डॉ. अरविंद कोलते, दिलीपभाऊ देशमुख, अॅड साहेबराव मोरे, अॅड हरीश रावळ, नारायणदास निहलानी, हाजी रशीदखा जमादार, शाम राठी, अॅड संजय वानखेडे, युसुफ खान, अताउर रहेमान जमादार, प्रमोददादा अवसरमोल, अॅड जावेद कुरेशी, मंगलाताई पाटील, संभाजी शिर्के, बंडूभाऊ चौधरी, राजू पाटील,राजेंद्र वाडेकर, सनाउल्लाखा जमादार, सुहास चवरे, रोहन देशमुख, प्रा. डॉ. अनिल खर्चे सर, प्रवीण क्षिरसागर पाटील, शिरीष डोरले, मनोहर पाटील, दिलीप गोळीवाले, विशाल पाटील, ज्ञानदेव ढगे, मयूर नरवाडे, तुषार पाटील, रईसखा जमादार, हरीश सिद्धीक सुपडू, अनिल गांधी, सादिक शेख, रामेश्वर गोरले, राजू जवरे, या पदाधिकाऱ्यांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रासह अनेक मान्यवरांनी आमदार राजेश एकडे कडे यांना शुभेच्छा प्रदान केल्या.
0 Comments