Advertisement

.पु.बाबुसिंग महाराज यांच्या शुभ हस्ते चिंचपूर येथे श्री संत तपस्वी डॉ.रामराव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा उत्साहात संपन्न*माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन व समाज एकतेचे केले कौतुकखामगाव /(संतोष आटोळे)

*प.पु.बाबुसिंग महाराज यांच्या शुभ हस्ते चिंचपूर येथे श्री संत तपस्वी डॉ.रामराव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा उत्साहात संपन्न*
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन व समाज एकतेचे केले कौतुक
खामगाव /(संतोष आटोळे) तालुक्यातील चिंचपूर येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर संस्थानमध्ये  बंजारा समाजाचे धर्मगुरु  संत तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा रविवार दि.03 मे 2026 रोजी  मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. ब्रम्हवृंदांच्या हस्ते विधीवत पुजा-अर्चा करुन गादीपती पिठाधीश्वर प.पू.धर्मगुरु डॉ.बाबुसिंग महाराज (बंजारा काशी पोहरादेवी) यांच्या शुभहस्ते अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला. या सोहळयाला खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, शिवाजीराव पांढरे,बाबुलाल राठोड,चांदुलाल चव्हाण,मदन चव्हाण यांच्यासह बंजारा समाजातील मान्यवर व्यक्ती व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहुन सहभाग नोंदविला.

याप्रसंगी श्री संत सेवालाल महाराज मंदिर संस्थान चिंचपूरच्या वतीने  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पोहरादेवी संस्थानचे श्री संत बाबुसिंग महाराज यांचा शाल व पुष्पहार घालुन सत्कार करुन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी राजु लक्ष्मण राठोड, शेषराव राठोड,नंदु पवार,गणेश राठोड, गोविंद राठोड,कारभारी मदन चव्हाण,नायक बाबुलाल राठोड,चंदुलाल चव्हाण आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संत बाबुसिंग महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,डॉ.रामराव महाराज हे महान अध्यात्मीक नेते आणि समाज सुधारक होते,त्यांनी आयुष्यभर,व्यसनमुक्ती,शिक्षण प्रसार,अंधश्रध्दा निर्मुलन आणि समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा विरुध्द लढा दिला.श्री संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा वारसा चालवत त्यांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आण्ाण्याचे मोठे कार्य केले.पोहरादेवी संस्थानचे प्रमुख म्हणुन त्यांनी बंजारा समाजाला एकजुट ठेवुन दिशा देण्याचे कार्य केले असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले , तपस्वी डॉ.रामराव महाराज यांनी बंजारा समाज बांधवांना योग्य दिशा दाखविण्यासाठी महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे. आज चिंचपूर येथे त्यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे.अश्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये ऐक्य, बंधुभाव व संस्कार जपले जातात असे सांगत ग्रामस्थांच्या एकतेचे व आयोजनाचे विशेष कौतुक केले. तसेच अशा आध्यात्मिक उपक्रमांमुळे युवकांना चांगली दिशा मिळते, असे सानंदा यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी श्री संत सेवालाल महाराज मंदिरामध्ये जगदंबा माता, श्री संत सेवालाल महाराज व तपस्वी डॉ.रामराव महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन दर्शन घेतले. मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उपस्थित भाविका भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत सेवालाल महाराज मंदिर संस्थान चिंचपूरचे समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments