Advertisement

जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटरचे लोकार्पण; गोरगरिबांना मिळणार मोठा दिलासा**​पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

*जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटरचे लोकार्पण; गोरगरिबांना मिळणार मोठा दिलासा*

*​पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*
*​बुलढाणा दि.3 (जिमाका):* महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवेत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे अत्याधुनिक एमआरआय (MRI) सेंटरचे लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. मकरंदजी आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या सुविधेमुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना आता महागड्या तपासण्यांसाठी शहराबाहेर जाण्याची गरज उरणार नाही.

​केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापरावजी जाधव आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या विशेष प्रयत्नांतून ही एमआरआय मशीन उपलब्ध झाली आहे. विशेषतः बुलढाण्याचे आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी या सेंटरसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.


​उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, "या अत्याधुनिक सेंटरमुळे सर्वसामान्य रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक वैद्यकीय सेवा मिळणार आहे. वेळेत आणि स्वस्त दरात तपासणी होणार असल्याने रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल."

​आमदार संजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एमआरआय सेंटरमुळे रुग्णांचे अचूक निदान होऊन उपचारांची गती वाढेल. लवकरच जिल्ह्यात अत्याधुनिक क्रिटिकल कॅथलॅब सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले.

​या सोहळ्याला आमदार संजय गायकवाड, मनोज कायंदे, नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगंटे, ओमसिंग राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी, डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Post a Comment

0 Comments