*बोथाकाजी येथे तब्बल ३० वर्षानंतर पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा*
*गेट टुगेदर:जिल्हा परिषद शाळेतील आठवणींना मिळाला उजाळा*
*सेवानिवृत्त शिक्षकांनी केले मार्गदर्शन*
तब्बल ३० वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये १९९६-९७ बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदरच्या माध्यमातून त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर सेवानिवृत्त शिक्षकांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९९६-९७ साली इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर नुकतेच पार पडले. या स्नेहसंमेलनात २८ विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक प्रा. विजय खंडारे होते तर शिक्षक एस.आर.गवई, पी. के. खोडके, डी.बी.जेऊघाले, ए.डी.बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व शिक्षकांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
यानंतर विद्यार्थिनी सीमा दराडे, वर्षा इंगळे, पंचकुला कस्तुरे, मीरा डिक्कर, संगीता ढोरे यांच्या हस्ते प्रा. विजय खंडारे यांचा तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मागील दोन ते तीन महिन्यापासून गेट-टुगेदर साठी सर्व विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू होते. त्या नियोजनाला मूर्तीमंत रूप आले. खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पडला. संचालन महादेव पाटील यांनी तर आभार नाना हिवराळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल कस्तुरे, नूर खान पठाण, गौतम वाकोडे, विजय सुरवाडे, रितवान शेगोकार,परमेश्वर सरोदे, संजय पारखेडे, संदीप कस्तुरे, शत्रुघ्न वानखडे, दीपक पाठक, प्रमोद रिंढे,प्रदीप कस्तुरे, भगवान टिकार, सलीम शहा अकबर शहा, विनोद रिंढे, गोपाल माहोरकार, गोविंदा हागे, कैलास आरज, अशोक तायडे यांनी परिश्रम घेतले. पुन्हा लाकडी बाकावर बसल्याने मिळाला आनंद - ३० वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित पाहून शिक्षक समाधानी झाले.तर सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत, याचा फायदा समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे मत व्यक्त केले यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. वर्गात पुन्हा एकदा लाकडी बाकावर बसल्याने माजी विद्यार्थ्यांना आनंद मिळाला.
0 Comments