*खामगाव,* दि. ८ मे (उमाका) : वझर मंडळांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ ग्रामपंचायत गणेशपूर येथे उत्साहात संपन्न झाले. शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले.
सदर शिबिरात ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडील जिवंत सातबारा अभियानांतर्गत १७ खातेदारांना ७/१२ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. तसेच उत्पन्न दाखले २०, जात प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्रे १२, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्रे ३, डोंगरी प्रमाणपत्रे ३१ अशा विविध प्रकारच्या एकूण १२० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
याशिवाय ग्रामविकास विभागामार्फत १५ लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आले. कृषी विभागाकडून २, पशुसंवर्धन विभागाकडून १ तर आरोग्य विभागामार्फत १५० आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजनांचे २३ मंजुरी आदेश लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. अशा प्रकारे शिबिरात एकूण ३११ प्रमाणपत्रे व मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास महसूल नायब तहसीलदार निखिल पाटील, नायब तहसीलदार संजय गांधी शाखेचे शिरीष वसावे, नायब तहसीलदार निवडणूक अभिजीत जोशी तसेच माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments