Advertisement

मुक्ताईनगरमध्ये गुटख्याच्या कंटेनरसह १ कोटी ६ लाखाचा मुद्देमाल जप्त.

मुक्ताईनगरमध्ये गुटख्याच्या कंटेनरसह १ कोटी ६ लाखाचा मुद्देमाल जप्त.
 मुक्ताईनगर प्रतिनिधी नागेश सुरंगे 

मुक्ताईनगरः मुक्ताईनगरमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह एक कोटी सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे बंदिस्त कंटेनरमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना मिळाल्याने त्यांच्या पथकाने २० जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुली जवळ कंटेनर क्रमांक एच आर ५५ ए क्यू ३८ ७३ याला थांबवून तपासणी केली. यात राजनिवास पानमसाला व झेड वन झिरो वन ज्या फरानी नावाचा अवैधरित्या वाहतूक होत असलेला गुटखा दिसून आला. पोलीस पथकाने सदरचा कंटेनर मुक्ताईनगर पोलीस ठाणे मध्ये आणत त्यामधील गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये पोलिसांना ७६ लाख १७ हजार ८०० रुपये किमतीचा राजनिवास पान मसाला व झेड वन झिरो वन ज्या फरानी जर्दी नावाचा पान मसाला मिळून आला.
सदरील अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या गुटख्याची कंटेनर हा कोटा राजस्थान येथून गुटखा घेऊन महाराष्ट्रातील सोलापूरकडे विक्री करण्यासाठी जात होता. याप्रकरणी आईजी पथकाचे पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांचे फिर्यादीवरून चालक लियाकत अली इस्लाम खान हरियाणा, मालक दिलीप बदलानी (रा. जळगाव), संतोष शर्मा (रा. दिल्ली), त्यागी जयपुर, मुबारक, नीलू पंजाबी (रा. भिवाडी राजस्थान) अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चालक लियाकत अली याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून कंटेनर सह गुटखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहे.

Post a Comment

0 Comments